Skip to content
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परळी विधानसभा अध्यक्षपदी गोविंदराव देशमुख यांची पुनर नियुक्ती, सर्वत्र अभिनंदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परळी विधानसभा अध्यक्षपदी धनंजय मुंडे यांचे विश्वासू गोविंदराव देशमुख यांची आज पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आल्याने देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीड येथे संपन्न झालेल्या पदाधिकारी संवाद मेळाव्याच्या दरम्यान सदर नियुक्तीची पत्रे खासदार सुनील तटकरे तसेच माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर ही पदे रिक्त होती. दरम्यान आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता धनंजय मुंडे यांच्या टीम मधील त्यांचे विश्वासू गोविंदराव देशमुख यांच्यासह वैजनाथराव सोळंके व बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली असून याबद्दल धनंजय मुंडे यांनी संबंधितांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ रूपालीताई चाकणकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार संजय भाऊ दौंड, माजी आमदार बाळासाहेब आजबे, युवक नेते अजय मुंडे यांसह पदाधिकारी व आजी-माजी लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
दरम्यान गोविंद देशमुख यांची परळी विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
Post Views: 131
error: Content is protected !!