Skip to content
पत्रकारांच्या कार्यशाळेला उपस्थित रहा
उबाळे, चौरे, साळुंके ,घरत, आंबेकर यांचे आवाहन

बीड/ प्रतिनिधी
रविवारी माहिती जनसंपर्क विभागाच्या वतीने होणाऱ्या कार्यशाळेला मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी उपस्थित राहून या कार्यशाळेचा आपल्या दैनंदिन कामासाठी उपयोग करावा. यासाठी रविवारी कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव रवी उबाळे, विभागीय समन्वयक सुभाष चौरे, राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर ,जिल्हा सरचिटणीस सुभाष सुतार, जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय अरबुणे, जिल्हा निमंत्रक दत्ता आंबेकर, जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत आदींनी केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या बीड जिल्हा माहिती कार्यालयाकडून जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा रविवार, 20 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात होणार आहे.
मूळ वर्धा जिल्ह्यातील व सध्या परभणीमध्ये जिजाऊ ज्ञानतीर्थ महाविद्यालयात शिक्षक असलेले दीपक रंगारी ‘वृत्तसंकलन-संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व’, माध्यम तज्ज्ञ आणि पत्रकारितेची पायवाट आणि संरक्षण पत्रकारिता या ग्रंथांचे लेखक प्रा. शिवशंकर पटवारी ‘कृत्रिम बुद्धीमत्ता आणि पत्रकारिता’ या विषयावर तर ‘समाज माध्यमांसाठी लेखन कौशल्ये’ यावर छत्रपती संभाजी नगर येथील माध्यम तज्ज्ञ डॉ. प्रभू गोरे मार्गदर्शन करणार आहेत.
अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी आदी पत्रकारांसाठी असलेल्या योजनांबाबत प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके माहिती देणार आहेत. या कार्यशाळेस सर्व पत्रकार बांधवांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव रवी उबाळे, विभागीय समन्वयक सुभाष चौरे, राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर, जिल्हा सरचिटणीस सुभाष सुतार, जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय अरबुने, जिल्हा निमंत्रक दत्ता आंबेकर, जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत आदींनी केले आहे.
Post Views: 117
error: Content is protected !!