उपमुख्यमंत्री ना अजित पवार व माजी मंत्री व आ. धनंजय मुंडे यांच्या जीवावर कोट्यावधी रुपयांच्या गुत्तेदाऱ्या करणाऱ्या कार्यकर्त्यांना बॅनर लावण्या शिवाय सामाजिक उपक्रम राबवण्यास वेळ नाही राजकिशोर मोदी यांनी ठेवलेल्या सामाजिक उपक्रमात “तुम्हारे खत मे हमारा सलाम” करण्याचा मात्र केला पराक्रम
उपमुख्यमंत्री ना अजित पवार व माजी मंत्री व आ. धनंजय मुंडे यांच्या जीवावर कोट्यावधी रुपयांच्या गुत्तेदाऱ्या करणाऱ्या कार्यकर्त्यांना बॅनर लावण्या शिवाय सामाजिक उपक्रम राबवण्यास वेळ नाही
राजकिशोर मोदी यांनी ठेवलेल्या सामाजिक उपक्रमात “तुम्हारे खत मे हमारा सलाम” करण्याचा मात्र केला पराक्रम

अंबाजोगाई
राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार व माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्या नावावर व जीवावर कोट्यावधी रुपयांच्या गुत्तेदाऱ्या व अन्य मार्गाने कामे करणाऱ्या व चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अंबाजोगाई शहरात व तालुक्यात डिजिटल बॅनर लावण्या शिवाय कुठलेही सामाजिक उपक्रम राबवण्यास वेळ नसून केवळ राजकिशोर मोदी यांनी ठेवलेल्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन “तुम्हारे खत मे हमारा सलाम” करण्याचा पराक्रम करताना ही मंडळी दिसून येत आहे.
15 जुलाई 2025 राज्याचे माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस राज्यभरासह अंबाजोगाई तालुक्यातही साजरा करण्यात आला येणाऱ्या 22 जुलै 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस राज्यभरासह अंबाजोगाईत साजरा होणार आहे.
या दोन्ही नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबाजोगाई नगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्या पुढाकारातून अंबाजोगाई शहरात सेवा सप्ताहाची आयोजन करण्यात आलेले असून या निमित्ताने या सप्ताहाचा प्रारंभ ग्रामदैवता माता श्री योगेश्वरी देवीची महाआरती, चनई येथील किरमानी बाबांच्या दर्ग्यावर फुलांची चादर चढवून
व संघर्ष भूमी येथे वंदन करून करण्यात आला.
या सेवा सप्ताहाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी ६३ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. ज्या मध्ये महादेव आदमाने ,अंकुश हेडे, दत्ता सरवदे, महेश कदम यांचे निलेश संजय डूके, महेबूब सुलेमान गवळी, अमर अशोक पाचपिंडे, रोहित विठ्ठलराव वारोडे, जाफ्री सय्यद खलीलोददीन, सलीम परसुवाले, संतोष लक्ष्मण चिमणे,
अशोक सुखदेव बनसोडे, आकाश अशोक गायकवाड, मच्छींद्र मधुकर बनसोडे, देवानंद विठ्ठल शिंदे, चौधरी अहमद, निवृत्ती मुजांजी जिरे, समाधान श्रीराम हांगे, सय्यद ताहेर, गुरु गौतम सरवदे, मारोती यादव कुकर, अनिकेत रतन तरकसे, सुजित सचिन मुसळे, राहुल हेडे, शुभम हेडे, महेश पाथरकर, संकेत राजकिशोर मोदी
ऋषिकेश सुधाकर साबळे, शुभम सतिष वैरागकर, अरविंद चंद्रकांत कोपले, शाहेद खान, शेख गफ्फार अकबर पठाण, शेख रिजवान, राहुल बालासाहेब वाघमारे, महेश सुरवसे, नकाते नेहा, गव्हाळकर साक्षी, जैस्वाल नरेश, संभाजी विठ्ठल गित्ते, सुमित नवनाथ सुरवसे, अतुल उत्तमराव पवार, शेख आयान, मुंडे बालाजी, राम जाधव, राहुल मोहिते, शरद काळे, रजनीकांत जाधव, शेख सरफाज शेख अकबर, प्रभाकर हजारे, बाळू मोहिते विनोद आनंद जाधव, खतीब समीर सल्लाओदिन, किशोर किरवले, सिदार्थ होके, निखील सखदे, दिपक सरवदे, निलेश जोगदंड, ओम तोंडे, उज्जैन बनसोडे, सिध्देश्वर वैदय, विजय किसन कांबळे
लौसिफ सिद्दकी, आनंद सुर्यवंशी, अक्षय सुरवसे, विशाल गंगणे, अबदुल रन्नू, रफीक गवळी, राहुल सिताराम आडे, शकील हसण गवळी आदी अनेक सहकारी मित्र रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्तपने सहभागी झाले होते.
एकीकडे राजकिशोर मोदी यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या या सेवा सप्ताहात 22 जुलै पर्यंत विविध कार्यक्रम संपन्न होत असतानाच दुसरी कडे मात्र
राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार व माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्या नावावर व जीवावर कोट्यावधी रुपयांच्या गुत्तेदाऱ्या व अन्य मार्गाने कामे करणाऱ्या व चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अंबाजोगाई शहरात व तालुक्यात डिजिटल बॅनर लावण्या शिवाय कुठलेही सामाजिक उपक्रम राबवण्यास वेळ दिसून येत नाही हे दुर्देव आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचे हे ग्राउंड लेव्हल आसुन अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे सर्वे सर्व आहेत याशिवाय दोन्ही डगरीवर हात ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचेही हे ग्राउंड लेव्हल असताना केवळ नेता आला की पुढे पुढे करण्या पलीकडे यांना दुसरा उद्योग दिसून येत नाही. नेत्याच्या जीवावर काहींनी अनेक सत्तेची पदे उपभोगली, काही जण आजही पदावर आहेत. केवळ नेत्यांच्या नावावर कोट्यावधी रुपये कमावून केवळ स्वतःचे घर भरण्या पलीकडे सामाजिक कार्यासाठी एक रुपयाही खर्च न करणाऱ्या आणि फुकटची प्रसिद्धी हवी असणाऱ्या या कार्यकर्त्यांनी आ धंनजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्य केवळ राजकिशोर मोदी यांनी ठेवलेल्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन “तुम्हारे खत मे हमारा सलाम” करण्याचा पराक्रम केल्याचे मात्र दिसून आले.
Post Views: 635