Skip to content
*श्री योगेश्वरी देवल कमिटीकडून मंदिरात आलेल्या जवळपास १०० पालख्यांची मोफत भोजन व निवासाची सोय*

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण राज्यातून पंढरपूरकडे शेकडो पालख्या पायी मार्गक्रमण करत आहेत. यातीलच अनेक पालख्या अंबाजोगाई शहरात येऊन येथील श्री योगेश्वरी देवी मंदिरात मुक्कामी थांबत होत्या. मुक्कामी थांबल्यानंतर त्या त्या पालख्यातील वारकऱ्यांची मोफत निवास व भोजनाची व्यवस्था श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली होती. यामध्ये त्यांना चहा , नाष्टा व भोजनाची व्यवस्था अतिशय उत्तमरीत्या करण्यात आल्याची माहिती श्री योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव प्रा अशोक लोमटे, उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.
अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचे मंदिर हे अतिशय पुरातन काळापासून प्रसिध्द आहे. येथे दररोज हजारो भावीकभक्त दर्शनासाठी येतात. येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दररोज महाप्रसाद दिला जातो. या भक्तांव्यतिरिक्त आषाढी वारीसाठी आलेल्या विविध पायी दिंड्यातील शेकडो वारकऱ्यांची देखील निवास व भोजनाची व्यवस्था देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली. गेली महिनाभरात श्री योगेश्वरी मंदिरात आलेल्या जवळपास १०० पालख्यां व त्यांसोबत आलेले अनेक पायी वारकरी मंडळ मुक्कामी आले होते. आलेल्या सर्व पालख्यांचे स्वागत श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने करण्यात येऊन त्यांच्या यथायोग्य सन्मान केला जात होता. मंदिर प्रशासनाच्या द्वारे केलेल्या सर्व सोयीसुविधा पाहून आलेल्या सर्व वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यापुढील काळात मंदिर प्रशासन हे आषाढी वारीत आलेल्या संपूर्ण वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्राथमिक औषधोपचार मंदिरातच करण्याचा मानस कमिटी करणार असल्याचे देखील सचिव प्रा अशोक लोमटे तथा उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह संचालक मंडळाने बोलून दाखवला आहे.
Post Views: 338
error: Content is protected !!