औसा ते तुळजापूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कार उलटून अंबाजोगाई तालुक्यातील एक ठार तर पाच जण जखमी
औसा ते तुळजापूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कार उलटून अंबाजोगाई तालुक्यातील एक ठार तर पाच जण जखमी
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
औसा ते तुळजापूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अंबाजोगाई तालुक्यातील उजनी येथील शाळेत शिकणारे सहा वर्गमित्र कारमधून तुळजापूर देवीच्या दर्शनाला जात असतांना शिंदाळा (लो) गावाजवळ झालेल्या भिषण अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी संरक्षक बॅरिगेट तोडून सर्विस रोडवर पलट्या खाल्ल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगा तालुक्यातील सहा शाळकरी तरुण शनिवार( ता. ५) जुलै रोजी (एम एच ४६ एपी १२१०) या कारच्या भीषण अपघातात कार्तिक किरण गायकवाड (वय-२२, रा. उजनी, ता. अंबाजोगाई) याचा जागीच मृत्यू झाला आहे तर ओमकार सुदर्शन गिरी (वय-१७, रा. उजनी, ता. अंबाजोगाई), शिवम नारायण गुट्टे (वय-२०, रा. खापरडोंग, ता. अंबाजोगाई), रोहन विजय कांगणे (वय-२२, रा. कांगणेवाडी, ता. अंबाजोगाई) किरण पाटलोबा कांगणे (वय-२०, रा. कांगणेवाडी, ता. अंबाजोगाई) राजेश शाम भारती (वय-१९, रा. उजनी ता. अंबाजोगाई) हे गंभीर जखमी झाले आहेत.
