नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने डॉक्टरकीचे स्वप्न पाहणाऱ्या पोटच्या मुलीला जात्याच्या लाकडी खुंट्यानं केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू
नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने डॉक्टरकीचे स्वप्न पाहणाऱ्या पोटच्या मुलीला जात्याच्या लाकडी खुंट्यानं केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू
सांगली
नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने डॉक्टरकीचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या पोटच्या मुलीला जात्याच्या लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केल्याने या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातून समोर आहे.
सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी गावात बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले ? म्हणत धोंडीराम भोसले या मुख्याध्यापक बापाने यांनी रागाच्या भरात पोटची मुलगी साधनास लाकडी खुंट्याने मारहाण केली .या मारहाणीत साधना ही गंभीर जखमी झाली.मारहाणीमुळे तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिचा मृत्यू झाला .
जखमी अवस्थेत टाकून बाप योग दिनासाठी निघून गेला
साधना भोसले ही बारावी मध्ये शिक्षण घेत होती .डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं .साधनाही आटपाडी मधील विद्यालयात राहत होती . दोन दिवसांपूर्वीच ती घरी नेलकरंजी येथे गेली असताना नीट परीक्षेचा निकाल लागल्याचं तिने वडिलांना सांगितलं .नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याचं मुख्याध्यापक असणारे वडील धोंडीराम भोसले यांना कळताच ते प्रचंड संतापले . त्यांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने रात्री साधनास बेदम मारहाण केली .या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली होती .परंतु तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवशी सकाळी योग दिन साजरा करण्यासाठी ते शाळेत निघून गेले .शाळेतून परतल्यानंतर साधना बेशुद्ध अवस्थेतच असल्याचं त्यांना दिसून आलं .नंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले .परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता .साधना प्रचंड हुशार होती .दहावीत ९५ टक्के गुण तिने मिळवले होते .डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं .पण केवळ नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडूनच झालेल्या जबर मारहाणीत तिचा हकनाक बळी गेलाय .साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रविवारी मुख्याध्यापक वडील धोंडीराम भोसले यास अटक करण्यात आली आहे .
पप्पा, तुम्ही कुठे कलेक्टर झालात?
पप्पा, तुम्ही कुठे कलेक्टर झालात तुम्हालाही कमीच मार्क पडले होते ना? असं उलट उत्तर साधनाने दिल्याने संतापलेल्या बापाने अमानुष मारहाण केली या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या आटपाडीतील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे.साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. डॉक्टर बनण्याचे तिचं स्वप्न होतं. मात्र, तिला नीटच्या चाचणी परिक्षेत कमी मार्क मिळाले होते. त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यक धोंडीराम भोसले हे संतापले होते. दरम्यान या नाराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
