Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील सर्वच शाळांना लागू होणार नवीन वेळापत्रक ! शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चे सुधारित वेळापत्रक जाहीर !

महाराष्ट्रातील सर्वच शाळांना लागू होणार नवीन वेळापत्रक ! शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चे सुधारित वेळापत्रक जाहीर !

मुबंई 

    सध्या स्थितीला राज्यात 5 ऑक्टोबर 2017 च्या शासन परिपत्रकानुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विषयावर तासिका विभागणी लागू आसुन 16 / 4 / 2025 रोजी च्या शासन निर्णयानुसार राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदापासूनच सुरू होणार आहे.

   शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून टप्प्याटप्प्याने हे शैक्षणिक धोरण अमलात आणले जाणार आहे. यावर्षी फक्त पहिलीच्या वर्गासाठी हे नव शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. यानुसार पहिलीच्या वर्गासाठी नवीन अभ्यासक्रमाची सुद्धा यंदापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यानुसार पहिलीच्या अन दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने इयत्ता पहिली व दुसरीसाठी सर्व माध्यमांच्या शाळांकरिता सुधारित शालेय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 18 जून 2025 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार हे वेळापत्रक नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले असून, त्यात विषयवार तासिकांची स्पष्ट विभागणी करण्यात आली आहे.

नवीन वेळापत्रकानुसार शालेय वर्षामध्ये एकूण 365 दिवसांपैकी 210 दिवस अध्ययन-अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले असून, यासाठी एकूण ३५ आठवड्यांचा अभ्यासकाल निश्चित करण्यात आला आहे. उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा, मूल्यांकन व सहशालेय उपक्रम आयोजित केले जातील.

यामध्ये परीक्षा व अनुषंगिक कृतींसाठी 14 दिवस, तर सहशालेय उपक्रमांसाठी 13 दिवस निश्चित करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे रविवार व इतर सुट्ट्या मिळून एकूण 128 दिवस सुट्टीचे ठरवण्यात आले आहेत.

शाळांचा अध्यापन कालावधी एकसारखाच ठेवण्यात आला असून, त्यात फक्त परिपाठ, मधली सुट्टी व समृद्धीकरण तासिका यामध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार थोडाफार फरक असू शकतो असे शासन परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकात विषयांचे योग्य समायोजन केले असून, गणित, पर्यावरण, भाषा, आरोग्य शिक्षण व कलाशिक्षण यांना समप्रमाणात वेळ देण्यात आली असल्याचे वेळापत्रकातून स्पष्ट होत आहे.

या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा समतोल राखण्यास मदत होणार असून, सर्व माध्यमांच्या शाळांसाठी एकसंध अभ्यासाचा आराखडा लागू करण्यात येणार असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. शालेय जीवन अधिक गुणवत्ता व शिस्तबद्ध व्हावे, या हेतूने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षण विभागाने अलीकडेच स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!