ताज्या घडामोडी

विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्याने घाटनांदुर येथे युवकाचा दुर्दैव मृत्यू, गावावर शोककळा 

विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्याने घाटनांदुर येथे युवकाचा दुर्दैव मृत्यू, गावावर शोककळा

 घाटनांदुर
      विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे धनंजय देशमुख या 24 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर या ठिकाणी आज सकाळी घडली. या घटनेने  संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
    धनंजय राजाभाऊ जाधव (देशमुख) (वय २४) हा दररोजप्रमाणे तो सकाळी शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होता. यावेळी शेतामध्ये असलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे त्याला जोराचा विद्युत झटका बसला. यात तो जागीच कोसळला. त्यानंतर तातडीने त्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
     धनंजय हा अत्यंत शांत, हसतमुख आणि सर्वांशी मनमिळावून वागणारा युवक म्हणून ओळखला जात होता. तो आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वत्र या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

धनंजय हा आई-वडिलाला एकुलता एक मुलगा

    प्राप्त माहितीनुसार धनंजय हा त्याच्या आईवडिलास एकुलता एक मुलगा असून त्याने बीएससी चे शिक्षण पूर्ण केलेले होते. धनंजय ला दोन बहिणी असून धनंजयच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे त्याच्या आईवडिल व नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!