ताज्या घडामोडी

शिष्ट मंडळासोबत झालेली चर्चा आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली विनंती याचा सन्मान राखत पुजारी मंडळाचे उपोषण काही कालावधी साठी स्थगित 

शिष्ट मंडळासोबत झालेली चर्चा आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली विनंती याचा सन्मान राखत पुजारी मंडळाचे उपोषण काही कालावधी साठी स्थगित 

परळी (प्रतिनिधी)
   परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवस्थानच्या मालकीच्या सर्वे नं. 322 मधील जमिनीवर दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमन काढण्यात यावे या मागणी साठी पुजारी मंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी शिष्ट मंडळासोबत झालेली चर्चा आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली विनंती याचा सन्मान राखत काही काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पावन प्रभू वैद्यनाथ देवस्थानच्या इनामी जमिनीवर भूमाफियांकडून अतिक्रमण करण्यात आले असून, न्यायालयीन आदेश असूनही शासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने देवस्थानचे समस्त पुजारी मंडळीने बुधवार, दि. ११ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, परळी समोर उपोषण सुरु केले  होते.
   माननीय उच्च न्यायालय व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार परळी तहसील मंडळ अधिकारी यांनी वेळोवेळी संबंधित सर्वे नंबर परिसरात तीन वेळा भेट देऊन अतिक्रमण असल्याचा अहवाल सादर केला आहे. रिट केस नं. १८६/२००८ मध्येही जमिनीवरील अतिक्रमणाबाबत स्पष्ट निर्णय झालेला असून, दिनांक १७ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
   पुजाऱ्यांनी केलेल्या ठळक मागण्यांमध्ये, देवस्थानच्या इनामी जमिनीतून ताबडतोब अतिक्रमण हटवावे व ती मूळ स्वरूपात देवस्थानच्या ताब्यात द्यावी, असा ठाम आग्रह आसुन याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ अतिक्रमण हटवण्याची आणि जमिनीचा ताबा देवस्थानकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे.
     काल पासून पुजारी मंडळाने सुरु केलेल्या उपोषणास विविध राजकीय पक्ष संघटना सह जिल्हा भरातील गुरव समाज बांधव यांनी उपोषण स्थळी येऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला असून बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही उपोषणास पाठिंबा व्यक्त केला असून    राष्ट्रीय गुरव समाजाचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे, अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे नेते अण्णा शिंदे यांनीही उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे.
     या उपोषणाची दखल घेऊन व चिघळत चाललेले वातावरण पाहून प्रशासनाच्या वतीने आज उपोषणास बसलेले
बालासाहेब दत्तात्रय पुजारी, श्री संतोष राजाभाऊ पुजारी, श्री आकाश तानाजी पुजारी, श्री बालाजी पुजारी, श्री स्वप्नील गणेश पुजारी या सर्व पुजारी मंडळाच्या प्रतिनिधीस तहसीलदार यांनी लेखी पत्र दिले असून या पत्रात तहसीलदार यांनी सर्व संदर्भ असलेले पत्र आणि तलाठी व मंडळ अधिकारी यांचा अहवालाचा दाखला देत म्हंटले आहे की आपण जमीन सर्वे नं. 322 मधील जमीन शासन निगराणीमध्ये असलेली वैद्यानाथ देवस्थान इनाम जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमनाबाबच्या अनुषंगाने आपण आज दिनांक 11.06.2025 रोजी उपोषणास बसलेले आहात.
   आज मा. उपविभागीय अधिकारी, परळी वै. व श्री.मा. टि.पी. मुंडे (सर), वेदयनाथ देवस्थान ट्रस्ट सदस्य श्री राजेश्वर देशमुख व मनसे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांचे शिष्टमंडळ व इतर प्रतिष्ठित नागरिक व आपले समक्ष मध्ये झालेल्या चर्चेनुसार सदर प्रकरणात कायदेशिर कार्यवाही अनुसरणेसाठी या कार्यालयास साधारणतः 8 दिवस लागणार असल्याने आपण दिनांक 20.06.2025 पर्यंत आरंभीलेले उपोषण स्थगित करुन प्रशासनास सहकार्य करावे.
    प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले पत्र व शिष्ट मंडळा सोबत झालेली चर्चा या सर्वांचा सन्मान राखून परळी येथील पुजारी मंडळाने हे उपोषण तूर्तास स्थगित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!