ताज्या घडामोडी

सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराची भिंत कोसळली; छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन महिलांचा दबून मृत्यू

सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराची भिंत कोसळली; छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन महिलांचा दबून मृत्यू

छत्रपती संभाजी नगर 

   छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

    प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी म्हणून काम करायच्या. तर इतर ५ जण जखमी आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्वाती खैरनाथ (वय ३५, हल्ली मुक्काम रांजणगाव मुळगाव लासलगाव) आणि रेखा गायकवाड (वय ३८, सौभाग्य चौक एन ११ हडको) असं मयत झालेल्या महिलांची नावं असल्याचं समोर आलं आहे. काल सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान संभाजीनगर शहरात जोरदार वादळ आलं, पावसाच्या सरी कोसळल्या. सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा वरचा काही भाग निखळला आणि नागरिकांच्या अंगावर पडला. प्राथमिक माहितीनुसार ५ जण जखमी झाले आहेत. तर, एक जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रवेशद्वाराचं काही वर्षांपूर्वी नुतनीकरण झालं होतं, तो भाग कसा काय कोसळला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!