Skip to content
निर्धारित कार्यकाळ संपण्यापूर्वीच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर बदल्या प्रकरणी मॅट कोर्टाच्या बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीसा
छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी )
निर्धारित कार्यकाळ संपण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बेकायदेशीर बदल्याच्या विरोधात बीड जिल्ह्यातील बहुसंख्य पोलीस कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजी नगर मॅट कोर्टात धाव घेतली असून ऍड ओमप्रकाश माने यांच्या मार्फत दाखल याचिकेतील 18 पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मा मॅट कोर्टाने बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बीड पोलीस दलात कार्यरत असलेले संतोष एस. गाडे, गणेश बी. धनवडे, रामहरी टी. बंधने, माधव एम. भागवत, रेखा एफ. पवार, गणेश एस. जगताप, सौदागर एम. सावंत, सुभाष ए. क्षीरसागर, सुशांत एम. पवार, परमेश्वर के. शिंदे, सुरेखा सी. उगले, महारुद्र आर. डोईफोडे, दत्तात्रय ए. उगले, मच्छिन्द्र पी. कप्पे, उस्मान एम. शेख, सुशीला आर. हजारे, कौसल्या सी. ढाकणे, संजयकुमार आर. राठोड आदी 18 पोलीस कर्मचाऱ्या सह 22 कर्मचाऱ्यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निर्धारित कार्यकाळ संपण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बेकायदेशीर बदल्याच्या विरोधात छत्रपती संभाजी नगर येथील अॅडव्होकेट ओमप्रकाश माने यांच्या मार्फत मा.मॅट कोर्ट औरंगाबाद येथे केसेस दाखल केल्या असून मा.मॅट कोर्टाने पोलीस अधीक्षक बीड यांना 18 प्रकरणात नोटिस काढल्या आहेत. या सर्व नोटीस ला 30 जून पर्यंत उत्तर सादर करण्याचे पोलीस अधीक्षकांना आदेशीत करण्यात आले आसुन आणखी ऍड ओमप्रकाश माने यांच्या मार्फत 4 प्रकरने मॅट कोर्टात दाखल करण्यात येणार आहेत.
Post Views: 512
error: Content is protected !!