शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परळी येथे विद्युत सुरक्षा कार्यशाळा संपन्न..
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परळी येथे विद्युत सुरक्षा कार्यशाळा संपन्न..
परळी…. महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन १ ते ६ जूनदरम्यान राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने आयोजित विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. विद्युत अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित कर ।। व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार’ ..या विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त लोकनेते गोपीनाथ मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परळी वैजनाथ येथे कार्यशाळा संपन्न झाली.. याप्रसंगी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री राठोड साहेब यांनी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षा बद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे प्राचार्य श्री संतोष लोखंडे, गटनिदेशक श्री पुजारी महादेव, तसेच शिल्प निदेशक,श्री असद शेख सर,श्री खेडकर सर,श्री.भूतके विजय, श्री. बियाबानी सर, श्री सावंत शंकर यांनी परिश्रम घेतले..
