ताज्या घडामोडी

वैद्यनाथ देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण ; आकाश पुजारी यांची पोलिसात तक्रार 

वैद्यनाथ देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण ; आकाश पुजारी यांची पोलिसात तक्रार 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
      परळी शहरातील चांदापूर रोड भागातील वैद्यनाथ देवस्थानाच्या जागेवर काही जनाकडून अतिक्रमण करत असल्याची तक्रार आकाश पुजारी यांनी केली आसुन याबाबत कडक कारवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
     याबाबत शहर पोलीस स्टेशनंला दिलेल्या तक्रारी मध्ये म्हंटले आहे की, सर्व्हे नंबर ३२२/५ लागून असलेल्या वैद्यनाथ देवस्थान जमीनिवर कलम १४५ सीआरपीसी लागू असतानाही काही जन अतिक्रमण करत आहेत. वैद्यनाथ देवस्थानची इनामी जमीन आहे. सदर प्रकरणात तहसीलदार यांनी कलम १४५ सीआरपीसी कलम नुसार वादग्रस्त जमीनवर दोन्ही पार्टीला पायबंद  घालण्यात आला आसुन पुढील आदेश येई पर्यंत कोणीही हक्क गाजवू नये असे सांगण्यात आले असताना ही शेख खलील पाशा ऍटोवाला व इतर पाच ते सहा जणांनी जीसीबीच्या सहाय्याने वादग्रस्त जागेवर अतिक्रमण करून कलम १४५ सीआरपीसीचे उल्लंघन केले आहे. सदरील जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी या तक्रारी मधे आकाश पुजारी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!