संभाजी नगर मधील 6 कोटींच्या दरोडा प्रकणातील मुख्य आरोपीने अंगावर गाडी घातली… पोलिसांनी केला थेट एन्काऊंटर अंबाजोगाई शहरातील 2 अट्टल दरोडेखोरांनाही पोलिसांनी उचलले
संभाजी नगर मधील 6 कोटींच्या दरोडा प्रकणातील मुख्य आरोपीने अंगावर गाडी घातली… पोलिसांनी केला थेट एन्काऊंटर
अंबाजोगाई शहरातील 2 अट्टल दरोडेखोरांनाही पोलिसांनी उचलले
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर टाकण्यात आलेल्या सुमारे ६ कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणातील संशयीत मुख्य सूत्रधाराला अखेर पोलिसांनी काल रात्री वडगाव कोल्हाटी परिसरात चकमकीत ठार केल्याचे वृत्त असून या प्रकरणी आंबाजोगाई शहरातील दोन अट्टल दरोडेखोरासही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची खात्री लायक माहिती प्राप्त झाली आहे.
पोलिसांवर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संभाजीनगर येथील ६ कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणातील संशयीत मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकण्यासाठी गुन्हे शाखेने प्रचंड गुप्तता बाळगली होती. या कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा पोलिसांच्या धडाडीची चर्चा सुरू आहे.
१५ मे रोजी पहाटे २ ते ४ या वेळेत, ६ दरोडेखोरांनी उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाजनगरातील बंगल्यावर पिस्तुलाच्या धाकावर हल्ला केला. यावेळी साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. लड्डा कुटुंबीय त्यावेळी मुलाच्या पदवी प्रदान समारंभासाठी अमेरिकेला गेले होते. त्यांच्या १९ वर्षांपासूनचा विश्वासू कामगार संजय झळके याला बंगल्याची काळजी घेण्यासाठी ठेवले होते. मात्र, दरोडेखोरांनी त्याला धमकावून ही लूट केली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
गुन्हे शाखेचा तपास
या दरोड्याच्या तपासासाठी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे सोपवण्यात आली. गेल्या ११ दिवसांपासून गुन्हे शाखेची सात आणि एमआयडीसी वाळूज ठाण्याची दोन अशी एकूण नऊ पथके या प्रकरणाचा तपास करीत होती. या तपासादरम्यान पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र, दरोड्याचा मुख्य सूत्रधार अद्याप पसार होता. काल रात्री वडगाव कोल्हाटी परिसरात पोलिसांना मुख्य आरोपीचा ठावठिकाणा मिळाला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये मुख्य आरोपी ठार झाला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या गुप्त नियोजनाचा परिणाम मानली जात आहे.
पोलिसांची धाडसी कार्यवाही
या एन्काऊंटरमुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. शहरातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास वाढला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या दरोड्याच्या मागे आणखी कोणत्या कारणांचा समावेश आहे, याचा तपास अद्याप सुरू आहे. संजय झळके याच्यासह इतर ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी सुरू आहे, ज्यामुळे या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
आंबजोगाई शहरातील 2 दरोडेखोरांना पोलिसांनी उचलले
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर टाकण्यात आलेल्या सुमारे ६ कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणाच्या चौकशी कामी नियुक्त करण्यात आलेल्या पोलिसांच्या पथकाने अंबाजोगाई शहरात परवा रात्री येऊन 2 अट्टल दरोडे खोरांना उचलल्याची खात्री लायक माहिती प्राप्त झाली आहे.
