माजलगाव चे माजी आमदार आर टी उर्फ जिजा देशमुख यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू, जिल्ह्यावर शोककळा
माजलगाव चे माजी आमदार आर टी उर्फ जिजा देशमुख यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू, जिल्ह्यावर शोककळा
लातूर
माजलगाव येथील भाजपाचे माजी आमदार स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे खंदे समर्थक असलेले आर टी उर्फ जिजा देशमुख यांच्या फॉर्च्यूनर गाडीचा एक तासापूर्वी तुळजापूर ते औसा या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात आर टी देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आसुन बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


याविषयी प्राप्त माहिती अशी की माजलगाव येथील भाजपाचे माजी आमदार आर टी देशमुख हे आज आपल्या एम एच 44 ए डी 2797 या फोरचुनर गाडीतून तुळजापूरहून लातूरकडे येत असताना तुळजापूर औसा या राष्ट्रीय महामार्ग क्र 361 वर असलेल्या बेलकुंड गावानजीक त्यांच्या फॉर्च्यूनर गाडीचा भीषण अपघात होऊन ते यात गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांना रुग्णवाहिके मधून लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल कडे आणले जात असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.
बेळकुंड नजिक असलेल्या उड्डाणं पुलाहून जात असताना रस्त्यावर साचलेल्या पाण्या मूळे भरधाव वेगात निघालेली गाडी स्लिप झाली, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने चार पलट्या खाल्या व यातच त्यांचा मृत्यू झाला तर चालक गंभीर रित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आसुन मृत्यू समयी आर टी देशमुख यांचे वय 70 होते.

स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पाठीशी एक भाऊ म्हणून सदैव खंबीरपणे उभा राहणारे आर टी देशमुख उर्फ जिजा हे एक अत्यंत शांत संयमी व हसतमुख नेतृत्व बीड जिल्ह्याने गमावले असून त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
