Sunday, June 8, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

श्री स्वामी समर्थ बचत गटाची वाटचाल उत्तमरीत्या सुरू असून सभासदांनी  बचतीमध्ये आणखी वाढ केल्यास आपल्या स्वप्नातील घर तयार होण्यास वेळ लागणार नाही-      ज्येष्ठ मार्गदर्शक मनोज भाऊ लखेरा यांचे उदगार 

श्री स्वामी समर्थ बचत गटाची वाटचाल उत्तमरीत्या सुरू असून सभासदांनी  बचतीमध्ये आणखी वाढ केल्यास आपल्या स्वप्नातील घर तयार होण्यास वेळ लागणार नाही-

     ज्येष्ठ मार्गदर्शक मनोज भाऊ लखेरा यांचे उदगार 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
     श्री स्वामी समर्थ बचत गटाची वाटचाल अत्यंत उत्तमरीत्या सुरू असून बचत गटाच्या सभासदांनी आपल्या बचतीमध्ये आणखी वाढ केल्यास आपल्या स्वप्नातील घर तयार होण्यास काहीही वेळ लागणार नाही असे उद्गार ज्येष्ठ मार्गदर्शक मनोज भाऊ लखेरा यांनी काढले.
     आंबेजोगाई शहरात 50 महिला व पुरुषांनी एकत्रित येऊन एका विशिष्ट ध्येयाने निर्माण केलेल्या श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मनोज लखेरा हे बोलत होते. यावेळी सीसीसी बँकेची नवनिर्वाचित संचालक दिलीप लव्हारे, माजी सैनिक गोपीनाथराव काळे, ज्येष्ठ सदस्य पूनमचंद परिषद परदेशी, संजना राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी पुढे बोलताना बचत गटाचे मार्गदर्शक मनोज लखेरा म्हणाले कि, बचत गटाची वाटचाल अतिशय उत्तमरीत्या सुरू असून आपण मासिक रित्या जमा करत असलेल्या हप्त्यांमधून बचत गटाची आर्थिक उन्नती होणे ही कठीण बाब आहे त्यासाठी बचत गटाच्या सदस्यांनी एक रकमी एक लाख रुपये बचत गटाकडे जमा केले तर मोठा निधी बचत गटाकडे जमा होईल. यामुळे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सोयीचे होण्यास मदत होणार असून या माध्यमातून जमा झालेला सर्व पैसा रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक केल्यास निश्चित बचत गटाला बळ मिळणार आहे व त्यानंतरच खऱ्या अर्थाने बचत गटाची ध्येयपूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही.
     अध्यक्ष समारोपात बोलताना बचत गटाचे अध्यक्ष नरसिंग साबणे यांनी 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक सदस्यांनी एक लाख रुपये बचत गटाकडे जमा करावे व ज्यांना हे भरणे शक्य नाही त्यांना हा गट सोडावा लागणार असून त्यांच्या जागी नवीन सदस्याची भरती करण्यात येईल. जेणेकरून बचत गटाचा उद्देश साध्य करण्यासाठी विलंब लागणार नाही असे मत व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना बचत गटाचे सचिव दत्तात्रय आंबेकर यांनी मागील वर्षाचा आढावा सादर करून बचत गट कशा पद्धतीने यशस्वी रित्या वाटचाल करत आहे याविषयी सविस्तर मांडणी केली. या वेळी त्यांनी आगामी काळात बचत गटाच्या आर्थिक उन्नतीसाठी काय योजना राबवता येतील याविषयी प्रारूप आराखडा सादर करत त्यांनी आपले मार्गदर्शक मनोज लखेरा यांच्यामुळे बचत गटाला निश्चित बळ मिळणार असून आपली संकल्पना पूर्णत्वास जाणार आहे असे मत व्यक्त केले.
     यावेळी मान्यवरांच्या हस्ते सीसीसी बँकेवर निवड झालेले वाहक दिलीप लव्हारे यांचा सत्कार करण्यात आला
        या सभेत सभासदांनी 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येकी 1 लाख रु जमा करण्याचा आणि ऑगस्ट महिन्या पासून दरमहा दीड हजार हप्ता रुपये करण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला.
    यावेळी कोषाध्यक्ष संतोष वाघाळकर, परमेश्वर गीते, गणेश मसने, भागवत सेलूकर, संजय रानभरे, अशोक दळवे, राहुल देशपांडे, आत्माराम कदम, शामल आंबेकर, दिपाली गीत्ते, सरस्वती काळे, सज्जला राऊत, शामल पांचाळ, गजेंद्र आपेट, व्यंकटेश जोशी, अशोक थोरात दिलीप मारवाळ, तुळशीराम मारवाळ, विनोद जाधव, राजकुमार कुडके, निलेश जोगदंड आदी सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर गीते तर आभार प्रदर्शन राहुल देशपांडे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!