Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक सुविधा निर्मितीला प्राधान्य- उपमुख्यमंत्री अजित पवार

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक सुविधा निर्मितीला प्राधान्य- उपमुख्यमंत्री अजित पवार

 आवश्यक मनुष्यबळ, पायभूत सुविधांसाठी लवकरच वैद्यकीय शिक्षण विभाग आणि वित्त विभागाची संयुक्त बैठक घेणार

वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 वर्षपूर्ती निमित्त विविध सुविधा निर्मितीला निधी देणार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
     येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी असलेले एक महत्वाची आरोग्य संस्था आहे. या संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत असून याठिकाणी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी दिला जाईल. या निधीतून प्राधान्यक्रम निश्चित करून आवश्यक सुविधा निर्मिती करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार संजय दौंड, अक्षय मुंदडा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आरोग्य सहसंचालक डॉ. शिल्पा दमकुंडवार, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एम. थोरात यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवीपूर्व विद्यार्थी क्षमता १५० इतकी असून या प्रवेश क्षमतेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) निश्चित केलेल्या नियमानुसार आवश्यक पायाभूत सुविधा,  मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच वैद्यकीय शिक्षण विभाग आणि वित्त विभागाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल. तसेच आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या निधीतून करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार आराखडा तयार करावा. पायभूत सुविधांची निर्मिती करताना उपलब्ध जागेचा पुरेपूर आणि योग्य वापर होण्यासाठी तज्ज्ञ आर्किटेक्टची नेमणूक करावी. महाविद्यालयाच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवावे, तसेच पुन्हा अतिक्रमण होवू नये, यासाठी संपूर्ण परिसराला सुरक्षा भिंत बांधण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.
ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा अत्यावश्यक आणि दर्जेदार कामासाठी विनियोग करावा. औषधांच्या बाबतीत कोणत्याही तक्रारी येवू नयेत, याची काळजी घ्यावी. सध्या सुरू असलेली बाह्यरुग्ण विभाग, मुलांचे वसतिगृह आणि मुलींच्या वसतिगृहाचे काम उच्च दर्जाचे होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या शंभर एकर क्षेत्रामध्ये मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करावी, तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारावे.  महाविद्यालय  व रुग्णालयात, तसेच अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने, वसतिगृहातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वृक्ष लागवडीसाठी वापरावे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून परिसरात रुग्णांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी केले प्रेझेंटेशन 

    या वेळी स्वा रा ती चे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांनी प्रेझेंटेशन करत संस्थेचा इतिहास, स्थापना सन १ जुलै १९७५ पदवीपूर्व विद्यार्थी क्षमता: ५०, सद्यःस्थी तीमध्ये पदवीपूर्व विद्यार्थी क्षमता १५०, सद्यस्थितीमध्ये १६ विभागांमध्ये पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरु असून त्यास एनएमसीची मान्यता आहे. एमबीबीएस व एमडी कोर्सेस सहीत बीपीएमटी, डी एमएलटी, एएनएम, जीएनएम नर्सिंग हे कोर्सेस सुध्दा सुरु आहेत.

    रुग्णसंख्या व रुग्णालयातील मंजूर रुग्ण खाटा: ५१८, दैनंदिन बाह्यरुग्ण संख्या २००० ते २५००, दैनंदिन आंतररुग्ण संख्या ७०० ७५०, दैनंदिन मोठ्या शस्त्रक्रिया ५०
लहान शस्त्रक्रिया ४०, कोव्हिड १९ मध्ये संस्थेचे कार्य, कोव्हिड १९ मध्ये ४०० को व्हिड बेड, १५० ICU बेड उपलब्ध केले.
Mucourmycosis मध्ये ३५० रुग्णां वर उपचार केले. या कालावधी मध्ये लिक्विड ऑक्सी जन प्लांट, PSA ऑक्सी जन प्लांट सुरू करण्यात आले. आदी सकारात्मक बाबी पुढे करून संस्थेच्या आवश्यक मागण्या मांडल्या ज्यात 150 विद्यार्थी प्रवेश क्षमतेनुसार पदनिर्मिती करणेबाबत, पदवीपूर्व विद्यार्थी प्रवेशक्षमता ५० वरून सन २०१३ मधे १०० व २०१९ मध्ये १५० इतकी झालेली आहे, सद्यस्थिती मधे ५० विद्यार्थी क्षमतेनुसारच वर्ग १ ते ४ संवर्गातील मनुष्यबळ मंजूर आहे, पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे १५० विद्यार्थी क्षमतेनुसार वाढीव पदनिर्मितीचा प्रस्ताव दि. १३/०५/२०२५ अन्वये संचालनालयास सादर करण्यात आलेला आहे. सदरील प्रस्तावास मंजूरी प्रदान करून मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात यावे, खाटांची संख्या वाढविणे सद्य स्थितीत मंजूर खाटा ५१८, पदव्युत्तर व पदवीपूर्व विद्यार्थी क्षमता व NMC मानका नुसार आवश्यक खाटाः ११५०, आवश्यक वाढीव ६३२ वाढीव खाटांचा केलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी.
   सन २०२४-२५ हे वर्ष स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने सुवर्ण महोत्सवाच्या अनुषंगाने सुपर स्पेशालिटी युनिट, नेरोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट, कारडोलॉजि, सुपर स्पेशालिटी युनिट, इमर्जन्सी मेडिसिन युनिट, नेरो सर्जरी सुपर
सुपर स्पेशालिटी युनिट आदी नवीन युनिट सुरू करण्या करिता परिपूर्ण प्रस्ताव मान्यतेकरीता संचालनालयास सादर करण्यात आलेला आसुन या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात यावी
    या शिवाय धपाटे यांनी बाह्यरुग्ण विभाग इमारतीचे बांधकाम, २५० विद्यार्थी क्षमतेचे पदवीपूर्व मुलांचे वसतिगृहाचे बांधकाम, १६० क्षमतेचे पदवीपूर्व मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम, २३० खाटांच्या इमारतीचे फेज २ व फेज ३ चे बांधकाम प्रगती पथावर असल्याचे सांगितले. शिवाय ETP (Effluent Treatment Plant) & STP (Sewage Treatment Plant)

३०० विद्यार्थी क्षमतेचे अंतर वासीता वसतिगृह, क्रीडा संकुल, १००० आसन क्षमतेचे सांस्कृतिक सभागृह, भोजन कक्षा सह उपहारगृह आदी प्रस्तावित नवीन प्रकल्पा चा आराखडा मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!