Wednesday, May 21, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर* ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांना नागोजीराव दुधगावकर पुरस्कार

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर*
ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांना नागोजीराव दुधगावकर पुरस्कार

सिंधुदुर्ग नगरी /प्रतिनिधि

भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणारा “आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पत्रकार *मधुकर भावे* यांना तर नागोजीराव दुधगावकर पुरस्कार बीडचे दैनिक सुराज्यचे ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली. यावेळी एस.एम.देशमुख यांनी परिषदेचे अन्य पुरस्कार देखील जाहीर केले आहेत.

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी विविध पुरस्कारांनी राज्यातील पत्रकारांना सन्मानित केले जाते.. 2024 च्या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.. ज्येष्ठ पत्रकार *मधुकर भावे* यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.. 25, 000 रूपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. यापुर्वी हा पुरस्कार मा. गो. वैद्य, दिनू रणदिवे, पंढरीनाथ सावंत, प्रकाश जोशी आदि मान्यवर पत्रकारांना देण्यात आला आहे..जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे..
परिषदेच्यावतीने इतरही पुरस्कार दिले जातात..
परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार *महेश म्हात्रे* यांना जाहीर झाला आहे.. इलेक्ट्रॉनिक मिडियासाठीचा शशिकांत सांडभोर पुरस्कार *अभिजित करांडे* यांना दिला जात आहे..
प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार *अमेय तिरोडकर* यांना, भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार अंमळनेर येथील पत्रकार *पांडुरंग पाटील* यांना, नागोजीराव दुधगावकर पुरस्कार बीड येथील सुराज्य दैनिकाचे संपादक *सर्वोत्तम गावरस्कर* यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार गोवा सकाळचे संपादक *दिनेश केळुसकर* यांना महिला पत्रकारांसाठी असलेला सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार सिंधुदुर्ग येथील *सीमा मराठे* यांना जाहीर करण्यात आला आहे.. कृषी क्षेत्रातील पत्रकारांसाठी यावर्षी पासून माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.. तो अँग्रोवनचे पत्रकार *बाळासाहेब पाटील* यांना जाहीर करण्यात आला आहे..
मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिध्दीचे काम उल्लेखनीय करणारया राज्यातील प्रसिद्धी प्रतिनिधींना दिला जाणारा संतोष पवार स्मृती पुरस्कार यंदा पुणे येथील *भरत निगडे* यांना जाहीर करण्यात आला आहे..
एस.एम.देशमुख यांनी सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले आहे..
आज बाळशास्त्री जांभेकर यांची 179 वी पुण्यतिथी होती.. त्यानिमित्त बाळशास्त्री जांभेकर स्मारकात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.. तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची त्रैमासिक सभा देखील आज बाळशास्त्री जांभेकर स्मारक सिंधुदुर्ग येथे पार पडली त्यावेळी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली..
यावेळी परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, माजी अध्यक्ष गजानन नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, गणेश जेठे आदि उपस्थित होते. संपादक गावरस्कर यांना नागोजीराव दुधगावकर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे विभागीय सचिव रवी उबाळे ,समन्वयक सुभाष चौरे ,कार्यकारणी सदस्य विलास डोळसे, संपादक राजेंद्र होळकर, संपादक राजेंद्र आगवान, संपादक दिलीप खिस्ती, परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक दत्ता आंबेकर, जिल्हा उपाध्यक्ष गजानन मुडेगावकर, समन्वयक अभिमन्यू घरत,तालुका निमंत्रक मंगेश निटुरकर, समन्वयक लक्ष्मण नरनाळे आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!