Sunday, June 8, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

सलग २१ वर्षांची १००% निकालाची गौरवशाली परंपरा कायम*

*सलग २१ वर्षांची १००% निकालाची गौरवशाली परंपरा कायम*

अंबाजोगाई

माईर एम.आय.टी. पुणे संचलित कै. दादाराव कराड विद्यालय,नागझरी – अंबाजोगाई यांनी सलग २१ वर्षे १००% निकालाची परंपरा यंदाही कायम राखत फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) बोर्ड परीक्षेत सुयश यश संपादन केले आहे.

या परीक्षेत शाळेची विद्यार्थिनी *कु.* *अदिती लांडगे हिने* *९६%* *गुण* मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, ही शाळेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

यंदा एकूण ५५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 21 विद्यार्थी, 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 15 विद्यार्थी, 60% पेक्षा जास्त गुण मिळवणारे 12, विद्यार्थी तर 60 पेक्षा कमी गुण मिळवणारे फक्त 7 विद्यार्थी आहेत.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल माननीय संस्थापक अध्यक्ष डॉ. वि. दा. कराड, कार्यकारी संचालक मा. राजेशजी कराड, शुभांगीताई कराड, संचालक मा.संगप्पा तलेवाड, प्राचार्य श्री.रामराजे कराड,तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

*शाळेचा अखंड यशाचा आलेख ही शिस्त, गुणवत्ता आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची साक्ष आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!