Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

परळी मधील शिवराज दिवटेच्या मारहाण प्रकरणाला जातीय रंग देऊ नका–     बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचं जनतेला आवाहन

परळी मधील शिवराज दिवटेच्या मारहाण प्रकरणाला जातीय रंग देऊ नका–

    बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचं जनतेला  आवाहन

बीड 

    परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेल्या या मारहाणीला जातीय रंग न देण्याचे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केलं आहे.

   परळीतील शिवराज दिवटे या युवकाला  शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता परळीच्या पेट्रोल पंपावरून अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली, एका टोळक्याने डोंगराळ भागात नेत बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण करत शिवराज दिवटे या तरुणाला गंभीर जखमी केले .लोखंडी रॉड आणि कत्नीने मारहाण झाल्याचे त्याने वृत्त वाहिनीला सांगितले. याला सोडायचे नाही याचा संतोष देशमुख पार्ट -2 करायचा असे ते आपापसात बोलत असल्याचे शिवराज दिवटेने सांगितले, यातील सर्व आरोपी वेगवेगळ्या समाजाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे .

काय म्हणाले पोलीस अधीक्षक नवनीत काँवत ?

परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तत्कालिक कारणातून झाली आहे. या प्रकरणाला कुठलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आले असून दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिली. 16 मे रोजी परळीतील शिवराज दिवटे हा तरुण त्याच्या मित्रासोबत एका कार्यक्रमाला गेला होता. जेवण करत असताना काही अनोळखी व्यक्तींसोबत त्याचे किरकोळ भांडण झाले होते. या भांडणाची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. गावाकडे परत निघालेल्या शिवराज दिवटेला पेट्रोलपंपाजवळ गाठून काही ओळखीच्या व काही अनोळखी तरुणांनी त्याला जगदीश्वराच्या डोंगरावरून खाली उतरवले. नंतर तिथेच तरुणाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वेगवेगळ्या समाजाचे मुलं आहेत . हे प्रकरण तात्कालीन असून यामागे जातीय कारण नसल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं . हे प्रकरण गंभीर आहे .आरोपींवर कठोर व गंभीर गुन्ह्यांची नोंद आम्ही केली आहे .यात सखोल तपास होईल असे आश्वासनही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले .

बीड मारहाण प्रकरणावर अंजली दमानिया म्हणाल्या .

बीडचं परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे . कालची जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुलं होती ती अतिशय छोटी होती . 18 वर्षाच्या आसपासची होती . त्यात एक आणि व्हिडिओ आला होता, त्याच्यात त्या ज्याला मारलं.. त्याला ज्या पद्धतीने त्यांनी पाया पडायला लावलं होतं. ते बघून असं वाटतंय की बहुतेक ‘रिवेंज केस ‘होती . कुठेतरी हे सगळं आता भलत्या दिशेने जातंय . जसं आपण ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं होतं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करण्याची गरज आहे असं मला वाटतं . ‘ असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी म्हटलं .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!