आ. नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
आ. नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
‘ऑपरेशन सिंदूर’च्या ऐतिहासिक यशानंतर राष्ट्रभक्ती जागृती अभियानाच्या अंतर्गत केज विधानसभा मतदारसंघात आ. नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोटारसायकल तिरंगा यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आज सकाळी ८:३० वाजता ‘अक्षय निवास’, रिंग रोड येथून या मोटारसायकल तिरंगा यात्रेची सुरुवात झाली. देशभक्तीचे स्वर, युवकांची ऊर्जा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर भारावून निघाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सामूहिक राष्ट्रगीताने या यात्रेचा समारोप झाला.
या यात्रेला नंदकिशोर मुंदडा, आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा , डॉ. नवनाथ घुगे, डॉ . सुधीर धर्म पात्रे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, डॉ. श्रीनिवास रेड्डी, अनंत अरसुडे, शहराध्यक्ष संजय गंभीरे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
