कुवेतमध्ये अंबाजोगाईची लेक चमकली – रुज़ीन फातिमाने दहावीला मिळवले ९७.२% गुण
कुवेतमध्ये अंबाजोगाईची लेक चमकली – रुज़ीन फातिमाने दहावीला मिळवले ९७.२% गुण
आंबजोगाई
अंबाजोगाईची सुपुत्री आणि ग्रामीण विकास मंडळ, बंसारोळाचे अध्यक्ष तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते सय्यद सर यांची नात रुज़ीन फातिमा खलील सय्यद हिने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता १०वीच्या परीक्षेत ९७.२% गुण मिळवून आपल्या कुटुंबासह, शाळेचा आणि अंबाजोगाई शहराचा नावलौकिक वाढवला आहे. १३ मे २०२५ रोजी निकाल जाहीर झाला असून रुज़ीनने ५०० पैकी ४८६ गुण मिळवले आसुन तिला गणिता मध्ये ९९, इंग्रजी मध्ये ९८, फ्रेंच मध्ये ९८, समाजशास्त्र मध्ये ९६, विज्ञान मध्ये ९५ गुण मिळाले आहेत.
रुज़ीन ही Fahaheel Al-Watanieh Indian Private School (DPS), अहमदी, कुवेत या शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेतील शिक्षक, तिचे वर्गमित्र, कुवेतमधील भारतीय समुदाय, तसेच देश-विदेशातील नातेवाईकांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
तिच्या या उज्ज्वल यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासातील निष्ठा आणि चिकाटी आहे. तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन देणारे आई-वडील यांचा मोलाचा वाटा या यशात आहे. अभ्यासासाठी घरी तयार केलेले शांत व प्रेरणादायी वातावरण, आईवडिलांचे पाठबळ आणि तिची स्व:तःची इच्छाशक्ती या सर्व गोष्टींमुळे ती हे घवघवीत यश मिळवू शकली.
रुज़ीनचे वडील साय्यद खलील हे पेट्रोकेमिकल अभियंता असून, त्यांनी HSE मध्ये M.Tech पदवी प्राप्त केली आहे. ते २००६ सालापासून कुवेतमध्ये कार्यरत आहेत आणि सध्या Kuwait Integrated Petroleum Industries Company (KIPIC) मध्ये Safety Engineer म्हणून कार्यरत आहेत. तिच्या आईने तिच्या शिक्षणात कायमच खंबीर साथ दिली आहे. घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेली असतानाही, आईने रुज़ीनसाठी अभ्यासाचे पोषक वातावरण निर्माण केले आणि तिच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक व शैक्षणिक पाठबळ दिले. तिच्या यशामध्ये आई-वडिलांच्या आधाराचा मोठा वाटा आहे.
रुज़ीनची इच्छा वैद्यकीय क्षेत्रात (MBBS) शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याची आहे. समाजासाठी काहीतरी उपयुक्त करून योगदान देण्याची तिची इच्छा आहे.
तिच्या या यशामुळे अंबाजोगाई, बंसारोळा परिसर व कुटुंबातील सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद व शुभेच्छा देत आहेत.
