ताज्या घडामोडी

दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एर्टिगा गाडी पलटली दोन जण ठार तर पाच  जण जखमी 

दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एर्टिगा गाडी पलटली दोन ठार तर पाच  जण जखमी 

 अंबाजोगाई
       एका दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एर्टिगा गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीरित्या जखमी झाल्याची  घटना आज दुपारी अंबाजोगाई आडस रोडवरील उमराई पाटी नजीक घडली.
        याविषयी प्राप्त माहिती अशी कि  माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून
एम एच 05 सी व्ही 9186 या इर्टिगा गाडी मधून अंबाजोगाई कडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक मुस्लिम कुटुंब येत असताना आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटील नजीक असलेल्या दत्त मंदिर समोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आल्याने या दुचाकीस्वारास वाचवण्यासाठी इर्टिगा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि एर्टिगा जागेवर पलटी झाली यामध्ये या गाडीतून प्रवास करणारे पैकी शौकत अहमद शेख व खय्युम अब्बास अत्तार हे दोघे ठार झाले असून अरेफ जागीरदार, नवाब मिया शेख, वाजेद आबेद मोमीन, खाजा अमीर शेख, शरीफ इस्माईल मोमीन हे पाच जण गंभीरित्या जखमी झाले असून सर्व जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आसुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
       दरम्यान ही घटना होताच दुचाकी स्वार आपल्या दुचाकीसह घटनास्थळावरून फरार झाला असून जखमीं पैकी आणखी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्राने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!