डॉ प्रल्हाद गुरव हे असे रसायन आहे ज्या रसायनाने आलेल्या संधीच सोनं केल त्यामुळेच आंबेजोगाई, बीड जिल्हातच नाही तर आज मुंबई मध्ये देखील त्यांच्या कार्याचा डंका आहे अधिष्ठाता मा.डॉ.श्री. गणेश आ. शिंदे यांचे उदगार
डॉ प्रल्हाद गुरव हे असे रसायन आहे ज्या रसायनाने आलेल्या संधीच सोनं केल त्यामुळेच आंबेजोगाई, बीड जिल्हातच नाही तर आज मुंबई मध्ये देखील त्यांच्या कार्याचा डंका आहे
अधिष्ठाता मा.डॉ.श्री. गणेश आ. शिंदे यांचे उदगार
मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या OVAJEET IVF PERTILITY & WELLNESS सेंटर विस्तार व नूतनीकरण सोहळा संपन्न
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
डॉ प्रल्हाद गुरव हे असे रसायन आहे ज्या रसायनाने आलेल्या संधीच सोनं केले.
ही व्यक्ती काही थांबणारी नाही त्याच्या प्रत्येक पेशी पेशी मध्ये संचार भरलेला आहे, आंबजोगाई मध्ये त्यांनी जे विश्व् निर्माण केले आहे ही ती प्रल्हाद साठी मध्यंतर असून आंबेजोगाई, बीड जिल्हातच नाही तर आज मुंबई मध्ये देखील डॉक्टर प्रल्हादच्या कार्याचा डंका आहे असे उदगार मा.डॉ.श्री. गणेश आ. शिंदे (मा. अधिष्ठाता, कुपर हॉस्पिटल, मुंबई) यांनी काढले.
डॉ. गुरव यांचे योगेश्वरी मॅटर्निटी होम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व अंबाजोगाई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या OVAJEET IVF PERTILITY & WELLNESS सेंटर विस्तार व नूतनीकरण सोहळा आणि OVANEST सरोगसी सेंटर • गर्भाकूर गॅमेट बँक फेमिलिफ्ट कॉस्मेटीक गायनॅकॉलॉजी सेंटरचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला
या प्रसंगी उदघाटक म्हणून डॉ शिंदे हे बोलत होते.
श्रद्धेय कै. सौ. रुक्मिण दत्तात्रय गुरव, ह.भ.प. केशव महाराज गित्ते-सासुरेकर, ह.भ.प. विष्णु महाराज सासुरेकर, सौ. आशाबाई व श्री. बन्सी मारुती गुरव, सौ. उर्मिला व श्री. गुणवंत शिवाजी धेंडुळे, श्री. दत्तात्रय मारुती गुरव. ह.भ.प. श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प. तुकाराम महाराज आंधळे, ह.भ.प. अण्णा महाराज उगले, सौ. आशाबाई व श्री. सखाराम माधव नजन यांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी मा.श्री. बालासाहेबजी दोडतले, मा.श्री. संजयजी दौंड, मा.श्री. राजेसाहेबजी देशमुख, मा.श्री. राजकिशोरजी मोदी, मा.डॉ. श्री. अशोकजी थोरात, मा.डॉ.श्री. प्रशांत माले, मा.श्री. पृथ्वीराजजी साठे, मा.श्री. माधवजी निर्मळ, मा.श्री. बबन (भैय्या) लोमटे,, मा.डॉ.सौ. शालिनीताई गदळे (कराड), मा. अॅड.श्री. माधव जाधव यांची तर प्रमुख्य अतिथि म्हणून मा.श्री. अरुण काळे, मा श्री. दत्तात्रेय ठोंबरे मा. डॉ. श्री. नवनाथ घुगे,
मा. डॉ. श्री. नरेंद्र काळे, मा.श्री. राजमोहनजी जाजू, मा.श्री. संजय गंभीरे, मा. श्री. रमाकांत (बापू) मुंडे, मा. डॉ. श्री. शंकर काशीद, श्री हीरालाल कराड, मा.श्री. प्रशांत बर्दापूरकर, श्री अजितदादा गरड, मा.डॉ. श्री. राजेश इंगोले, मा. डॉ. श्री. प्रशांत असेगांवकर, मा. डॉ. श्री सुलभा पाटिल, मा.श्री. नानासाहेब देशमुख, मा.डॉ.श्री. बालासाहेब लोमटे, मा.श्री. सारंग पुजारी, मा.श्री. संतोष राशीनकर, मा श्री. दत्तात्रय अंबेकर, मा.श्री. ठाकुर उदयसिंह दिख्खत यांच्या सह मा. डॉ. श्री सिद्धेश्वर बिराजदार, मा.डॉ.श्री. संजय राऊत, श्री बालासाहेब अम्बाड,
मा. डॉ. श्री. राकेश जाधव, मा. डॉ.श्री. सुनिल जाधव, डॉ. श्री. शंकर धपाटे, एस. चेतना हिल उठी, मा.श्री. देविदास जाधव
मा. डॉ.श्री. उल्हास गंडाल, मा.श्री. अनिल चोरमले, मा.डॉ.श्री. गणेश तोंडगे, मा डॉ.श्री. चंद्रकांत चव्हाण आदी शासकीय व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ गणेश शिंदे म्हणाले कि, डॉ प्रल्हाद गुरव हे असं व्यक्तिमत्व आहे जे थांबणारे नाही. त्यांनी पण बरेच जणांना शिकवलेल आहे. या दिसणाऱ्या वास्तू मध्ये रुग्णसेवा सोबत शिक्षणही प्रदान केल्या जाते. ते जसे शिकले आणि आज येथे प्रॅक्टिस करतात तसे त्यांच्याकडून बरेचसे शिकून जातात आणि विविध ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करतात. मी काही वर्षांपूर्वी आलो होतो मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की हे काय रसायन आहे आणि तुम्हाला जाता जाता असही म्हणालो होतो की हे रसायन आहे ह्याची माती करायची की सोन करायचं ते तुम्ही ठरवायचं आणि त्यामुळे आज मी तुमचे आभार मानायला आलोय की तुम्ही खरोखरच या रसायनाच सोनं केलं आपण याला मध्यंतर बोलूया. कारण ही व्यक्ती काय थांबणार नाही त्याच्या प्रत्येक पेशी पेशी मध्ये संचार भरलेला आहे. आपल्याला दिसताना एक व्यक्ती दिसते पण त्याच्या मागे बरीचशी शक्ती असते त्याच्यामागे आशीर्वाद असतात त्याच्यामागे सर्वांचे मेहनत असते प्रत्येक छोटी गोष्ट करणारा देखील त्याला हातभार लावत असतो. प्रल्हाद बरोबर एक लक्ष्मण आहे आणि तो म्हणजे आमचा अजय आणि ही राम लक्ष्मणाची जोडी अशीच अभेदय राहणार आहे. त्यांच्या मिसेस बद्दल तर काय बोलणार त्यांच्या पायगुणाने तर हे होत आले आहे. त्यांची ती छान मुलं अपूर्वा आणि अग्रजा आता त्यांच्यावर थोडीशी जबाबदारी वाढणार आहे कारण हे पुढे त्यांना चालवायचे आहे आणि हे चालणार आहे.
आंबेजोगाई बीड जिल्हातच नाही तर आज मुंबईमधील देखील डॉक्टर प्रल्हादचा डंका आहे आज माझ्याकडे अनेक विद्यार्थी आले सर्वजण प्रल्हाद नाही होऊ शकले.
आमच्या मेडिकलमध्ये वाक्य आहे कम्युनिटी टूकमुनिटी हे प्रल्हाद ने चांगलं जाणलेलं आहे म्हणून तो सर्व काही समाजा साठी करतो आहे.
या वेळी बोलताना डॉ शालिनी कराड म्हणाल्या कि, डॉ प्रल्हाद आणि आम्ही एकाच पाण्यातले अनु आणि रेणू आहोत. त्याचं कारण असं आहे की मी प्रल्हाद यांच्या हॉस्पिटलच्या उदघाटन प्रसंगी ही डॉ शिंदे सरासोबत होतो. आता शिंदे सर म्हणाले की मला रांगत रांगत यावे लागेल आणखी किती किती प्रल्हाद काय काय उभा करतो हे काही समजेना. सर मला सुद्धा काठी टेकवत टेकवत प्रत्येक कार्यक्रमाला यावे लागेल कारण कुठलाही छोटा कार्यक्रम असेल तरी मी तर काही किलोमीटरच्या अंतरावरआहे. प्रल्हाद माझ्या घरचा आहे माझा छोटा भाऊ आहे.
प्रल्हाद मुंबईमध्ये असता तर एवढं त्याच नाव झालं नसतं. इथे जे कष्ट प्रल्हादने केले तर याच्यामध्ये 50% पेशंट आहेत. प्रल्हाद रसायन सांगायचं झालं तर न समजणारे आहे.
प्रल्हाद देवगावचा आणि मी दहीफळ माऊलीची आम्ही दोघे एका शाळेत मी दहावीला माझा छोटा भाऊ आठवीला आणि प्रल्हाद सहावीला आणि प्रल्हाद ने काय कष्ट केले हे सर्व देवगावकर यांना माहित आहे. प्रल्हादचे वडील घोंगड विकायचे. त्यांनी आणि प्रल्हाद ने लहान वयात केलेले कष्ट आणि त्यातून केलेले शिक्षण याला तोड नाही. मी प्रल्हाद आणि डॉक्टर शशिकांत बेर्डे एकाच पुस्तकावर शिकलो. प्रल्हाद जेव्हा इतक्या कष्टातून पुढे येतो. इतक्या गोरगरिबांची जाण असणारा जेव्हा प्रल्हाद पुढे येतो तेव्हा सर निसर्गाला म्हणजे निसर्गालाही कळलं आणि पाऊस थांबला. प्रल्हादच्या हातात एवढे मोठे यश नक्कीच असणार असून आंबेजोगाई करांसाठी ही खूप मोठी पर्वनी आहे.
या वेळी बोलताना जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा म्हणाले कि, आज मात्र दिन आणि मात्र दिनाच्या दिवशी हजारो मातांना मातृत्व देण्या साठी डॉ प्रल्हाद गुरव यांनी अत्याधुनिक जी सुविधा उपलब्ध केली आहे त्याचे उद्घाटन होत आहे. त्यांची शिक्षणाची जिद्द वहिनीची साथ, गुरुचा आशीर्वाद आणि रुग्णांचे प्रेम त्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी आपले वेगळे विश्व्नि नीर्माण केले आहे. खरंतर प्रत्येक कुटुंबाला आपण आई व्हावं आपल्या कुटुंबात बाळा असावं हे स्वप्न असतं मला वाटतं जीवनाचा तो आशावाद असतो कारण जीवनामध्ये आशावादा शिवाय काहीच नाही. एखादया कुटुंबात कुठल्याही कारणामुळे बाळ होत नाही त्या कुटुंबात बाळ देणे या साठी डॉक्टरांनी मेहनत करून सगळ्या सुविधा उपलब्ध करुंन देत त्याच्या आयुष्याचा आनंद त्याला देणे ह्या पेक्षाही कोणता आशीर्वाद मोठा नाही. माझा आणि डॉक्टर साहेबांच्या वडिलांचा गेली 20-25 वर्षाचा संबंध आहे त्यांना आज निश्चितपणाने खूप मोठा आनंद झाला असेल की माझ्या मुलांना विश्व घडवलं हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यांमध्ये आहे ह्या पेक्षा डॉक्टर साहेब तुम्हाला आशीर्वाद कोणते पाहिजेत.
आशीर्वाद पर शुभेच्छा देताना ह भ प विष्णू महाराज म्हणाले कि, ईवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेळु गेला गगनावरी याचा मी साक्षीदार आहे, त्यांचा मी वर्गमित्र आहे दोन हजार रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास मित्रा आज आकाशा एवढा झाला. अख्या महाराष्ट्रात तुझं नाव होतं आहे. आमचा साधुसंतांचा विश्वास फक्त देवावर असतो. देव नंतर कृपा करतील पण एकदा का गुरव सरांकडे पेशंट पाठवला की त्याला यश हमखास येणार हा कायमस्वरूपी आमचा विश्वास असतो आणि तो विश्वास तुमच्या जीवावर. पुत्र प्राप्ती साठी तुम्हाला या पुढे आता फार कुठे जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. माझ्या जीवनात एवढा मोठा माणूस एवढ्या बारकाईनं सगळ्यांना मानसन्मान देणारा मी पाहिलेला नाही.
या वेळी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की डॉक्टर गावातून आले त्या गावाचं नाव देवगाव. देवगाव मधून त्यांनी शिक्षण घेत घेत मुंबईपर्यंत मजल मारली आज डॉक्टर गणेश शिंदे साहेब जे कूपर हॉस्पिटलचे सायन हॉस्पिटलचे डीन आहेत यांच्या हाताखाली हजारो विद्यार्थी शिकले त्यापैकी डॉक्टर गुरव पण त्यांनी ज्या पद्धतीने परिश्रम घेतले ज्या पद्धतीने शिक्षण घेतलं अनेक अडचणीवर मात करत असताना त्यांच्यासोबत त्यांच्या सुविधा पत्नी आदरणीय रेखाताई असतील त्यांचे बंधू असतील त्या सर्वांची त्यांना साथ मिळाले आणि त्याचबरोबर आंबेजोगाई शहरात पेशंट त्यांना मिळाले.
या वेळी प्रास्ताविक करताना डॉ प्रल्हाद गुरव यांनी आज पर्यंतचा इतिहास विषद करुंन सांगितले की माझे पेशंट कोण होते तर ऊसतोड कामगार होते. त्या गोरगरिबांकडे पैसे नव्हते पण तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्याचं, त्यांना मातृत्व देण्याचं काम मला करता आलं.
या वेळी सर्व मान्यवरांचा सत्कार डॉ. प्रल्हाद दत्तात्रय गुरव व डॉ. रेखा प्रल्हाद गुरव यांनी केला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ राजेश इंगोले यांनी केले.
सोहळ्याचे आकर्षण ठरला ‘सारं काही ‘ती’च्या साठी कार्यक्रम’
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
बाळूमामाच्या नावानं चांगभलं फेम अभिनेत्री, नृत्यांगना सौ स्वाती धोकटे व प्रसिद्ध गायिका सौ. सायली सांभारे व भाग्यश्री बांगरे, सारेगम फेम गायक अजित विसपुते व सुजीत सोमण हे राहिले. निवेदिका सौ. शोभा श्रीपाद कुलकर्णी दिग्दर्षित “सारं काही ‘ती’च्या साठी” स्त्री जन्माची कहाणी सांगणाऱ्या संकल्पनात्मक शोचा लाभ उपस्थितानी घेतला.
