मराठी पञकार परिषद प्रिंट व डिजीटल मिडीयाच्या सदस्यांनी एकञ येवून कार्य करावे- जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके
मराठी पञकार परिषद प्रिंट व डिजीटल मिडीयाच्या सदस्यांनी एकञ येवून कार्य करावे- जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-पुढील काळ सर्व पञकारांसाठी आव्हानात्मक असून अंबाजोगाई मराठी पञकार परिषद प्रिंट व डिजीटल मिडीयाच्या सर्व सदस्यांनी एकञ येवून कार्य करावे,असे मत मराठी पञकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी व्यक्त केले.
आज दुपारी अंबाजोगाई शहरातील बाळशास्ञी जांभेकर पञकार कक्षात मराठी पञकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशावरून मराठी पञकार परिषद प्रिंट व डिजीटल मिडीयाची बैठक संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हाकार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पञकार परिषदेचे विभागीय सचिव रवि उबाळे हे उपस्थित होते.तर व्यासपीठावर जिल्हा समन्वयक दत्तात्रय अंबेकर व अंबाजोगाई पञकार वैद्यकीय कक्ष प्रमुख डाॅ.राजेश इंगोले यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विशाल सांळुके म्हणाले की,बीड जिल्हयात अंबाजोगाई शहराचे नाव लौकिक आहे.मराठी पत्रकार परिषदेचे सर्वात जास्त कार्यक्रम हे अंबाजोगाईत होतात.मराठी पञकार परिषदेच्या सदस्यामुळेच संघटनेची ओळख असते.अंबाजोगाई मराठी पत्रकार परिषद प्रिंट व डिजीटल मिडीया हे एकाच छताखाली कार्य करतात.विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे कार्य महाराष्ट्रात सर्वदूर आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्याच्या सुखदुःखात सदैव साथ देणारी ही पञकार संघटना आहे. या बैठकीत शेवगाव येथे होणारया आगामी अधिवेशना बाबतही चर्चा करण्यात आली
तसेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात अंबाजोगाई येथे डीजीटल कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल.आधुनिक तंत्रज्ञान आणि डीजीटल बातम्यातील बारकावे आदीची माहिती डीजीटल मिडीयाच्या पञकारांना ज्ञात व्हावे या करिता लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल अशी माहितीही सांळुके यांनी दिली. तर विभागीय सचिव रवि उबाळे यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, बीड जिल्ह्यातील मराठी पञकार परिषद प्रिंट व डिजीटल मिडीयाच्या सर्व सदस्य हे संघाचे अंगभूत नेतृत्व करणारे सदस्य आहेत.विशेष करून अंबाजोगाई मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्यांचे कार्य उल्लेखनीय असून विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या सूचनेवरून लवकरच अंबाजोगाई शहरात डीजीटल कार्यशाळेचे आयोजन कसे होईल याचा विचार केला जाईल असे ही शेवटी बोलताना म्हणाले.
तर अंबाजोगाई मराठी पञकार परिषदेचे वैद्यकीय कक्ष प्रमुख डाॅ.राजेश इंगोले यांनी पञकार आणि डाॅक्टर यांचे कार्य एकच आहे.डाॅक्टर जीव वाचवतात तर पञकार अन्यायाला वाचा फोडतात.तेव्हा विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात ठिकठिकाणी वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून डाॅक्टरांची नेमणूक करणार असून पञकारांनी कुठलेही मतभेद न ठेवता कार्य करावे,असे मत व्यक्त केले.
या बैठकीचे सुञसंचलन पुनमचंद परदेशी,प्रास्ताविक सतिश मोरे तर आभार प्रदर्शन ज्ञानेश मातेकर यांनी केले.
या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी,मराठी पञकार परिषदेचे उपाध्यक्ष मारोती जोगदंड, डिजीटल मिडीयाचे तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे, उपाध्यक्ष संजय जोगदंड,विरेंद्र गुप्ता,एम.एम.कुलकर्णी,सलीम गवळी,वासुदेव शिंदे,बालाजी खैरमोडे,जोशी,सालेम पठाण, अशोक कोळी,अनिरुद्ध पांचाळ, अमोल माने,सचिन मोरे,संजय रानभरे,अरेफ भाई,योगेश डाके,सुर्यकांत उदारे सह मराठी पञकार परिषद प्रिंट व डिजीटल मिडीयाचे सदस्य उपस्थित होते.
*पञकार कन्या अक्षता सुर्यवंशी हिचा सत्कार करण्यात आला.*
आज झालेल्या बैठकीत बर्दापूर येथील पञकार गोविंद सुर्यवंशी यांची कन्या कु.अक्षता सुर्यवंशी यांची महापारेषण विभागात विद्युत सहय्यक पदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवर पञकार विशाल साळुंके,रवि उबाळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
