महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यात ‘ड्रोन’ दिसल्याने जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर; राज्यात खळबळ
महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यात ‘ड्रोन’ दिसल्याने जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर; राज्यात खळबळ
परभणी
राज्यातील परभणी, बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यात ड्रोन सदृश वस्तू दिसल्याने या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आसुन प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. दरम्यान या ड्रोन मूळे राज्यात खळबळ उडाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला असून चहूबाजूने गोळीबार आणि हवाई हल्ला सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पाकिस्तानकडून द्रोण हल्ले सुरू आहे.
मात्र भारताने सर्व द्रोण हल्ले हाणून पाडले. आज पुन्हा उरी सेक्टरमध्ये संध्याकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे. त्याचदरम्यान, महाराष्ट्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राज्यातील परभणी, बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यात ड्रोन सदृश वस्तू दिसल्याने या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आसुन प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. दरम्यान या ड्रोन मूळे राज्यात खळबळ उडाली असून परभणीच्या सेलू,गंगाखेड तालुक्यातून आकाशात ड्रोन सदृश वस्तू दिसली आहे. मात्र, गावकऱ्यांमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे. एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु आहे. त्याच अनुषंगाने अनेक ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं जात आहे. याचदरम्यान परभणीच्या सेलू आणि गंगाखेड तालुक्यातून आकाशात एकाच लाईनमध्ये अनेक ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्या आहेत. ग्रामीण भागात यामुळे कुतूहलला विषय झालाय. या काही भागात भीतीचं वातावरणही पसरलं आहे.
तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरात आज सायंकाळी अनेक वस्तू आकाशातून एका रांगेत जाताना दिसल्या. चकाकणाऱ्या या रांगेत जाणाऱ्या आकाशातील वस्तूंमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमक्या हे काय आहे? याबाबत आता परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. तिकडे भारत-पाकमध्ये ह.ल्ला हमला सुरु असताना अशा वस्तू आकाशातून जाताना दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या कोणत्या वस्तू आकाशातून जात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
जालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी, परतूर याठिकाणीही ड्रोन सदृश वस्तू दिसल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून ड्रोन सदृश वस्तूचा शोध सुरू आहे. जालना जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्या आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी आणि परतुरध्ये अनेक गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून या ड्रोन सदृश्य वस्तूचा शोध सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांना बळी पडू नये, असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे.
त्याचदरम्यान, हिंगोली जिल्ह्यातही ड्रोन सदृश्य वस्तू दिसली आहे. नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात फोटो आणि व्हिडिओ काढले आहे. औंढा तालुक्यातील गोजेगाव शिवारात नागरिकांना हे चित्र दिसलं आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
