परमार्थ आणि विज्ञानाची सांगड घालून केलेले समाजकार्य म्हणजे ईश्वर सेवा होय – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
परमार्थ आणि विज्ञानाची सांगड घालून केलेले समाजकार्य म्हणजे ईश्वर सेवा होय – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
रक्तदान ही सेवा सर्वोच्च मानवी सेवा आहे. यामुळे एखाद्या मृत्यू पावणाऱ्या रूग्णाचे प्राण वाचविता येतात, हे प्राण वाचविण्याचे दैवी काम रक्तदाते करीत असतात. परमार्थ आणि विज्ञान यांची परस्पर सांगड घातल्यास आणि त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी केल्यास ही मानवी सेवा ही ईश्वर सेवा केल्यासारखीच आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी केले.
महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये सर्व संतांनी मानवी सेवा केल्यास ईश्वरी सेवेचा पुण्य मिळेल असं वारंवार सांगितल आहे. यात संतांच्या वैचारिक मार्गदर्शनानूसार समाजसेवेचा ऐतिहासिक वारसा जपत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटक म्हणून बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले की, या देशांमध्ये सर्व महापुरूषांनी संत विचारास आत्मसात करून जनतेच्या हितासाठी कार्य केलेले आहे. याच कार्याचा वारसा जोपासत समाजातील ही तरूण पिढी अध्यात्म आणि विज्ञान यांची परस्पर सांगड घालत सेवा करीत आहेत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे डॉ.इंगोले यांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे आयोजित या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी सेवेकरी नरसिंग लोमटे, प्रकाश चव्हाण, विनोद कदम, श्रीनिवास रोगे, अशोक महामुने, ज्ञानेश्वर गडदे, सिद्धेश्वर कदम, हाटे, प्रदीप महाळकर, विकास सत्वधर यांनी परिश्रम घेतले.
=======================
=======================
