Thursday, May 8, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

राज्यात आदर्श गाव “रामेश्वर” सारखा बदल गावागावात  झाला तर हे भारत आदर्श राष्ट्र बनेल– माजी कुलपती नांलदा विद्यापीठ पद्मभूषण विजय भटकर यांचे उदगार

राज्यात आदर्श गाव “रामेश्वर” सारखा बदल गावागावात  झाला तर हे भारत आदर्श राष्ट्र बनेल–

माजी कुलपती नांलदा विद्यापीठ पद्मभूषण विजय भटकर यांचे उदगार 

विश्वधर्मी मानवतातीर्थ- रामेश्वर (रुई)
    राज्यात आदर्श गावाचे उदाहरण म्हणजे रामेश्वर असून या गावाला विश्वनाथाचा आशीर्वाद आहे. असा बदल गावागावात  झाला तर हे भारत आदर्श राष्ट्र बनेल असे उदगार माजी कुलपती नांलदा विद्यापीठ पद्मभूषण विजय भटकर यांनी काढले.
   विश्व् शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व समस्त रामेश्वर (रुई) ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने
संत श्री गोपाळबुवा महाराज विश्वशांती हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या प्रेरणेने व पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड यांच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या रामेश्वर (रुई) या पावन भूमिचे विश्वधर्मी मानवतातीर्थ- रामेश्वर (रुई) नामकरण मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले. या प्रसंगी ते बोलत होते.
      या वेळी माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड,
आमदार श्री. रमेश का. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, डॉ मिलिंद कराड, ज्येष्ठ कवी, लेखक व वक्ते डॉ. संजय उपाध्ये, माईर्स एमआयटी व कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेचे
कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त, डॉ. राहुल वि. कराड, सरस्वती पब्लिक स्कुलचे समन्वयक राजेश कराड यांच्या सह असंख्य मान्यवर, अध्यात्म क्षेत्रातील विविध महाराज उपस्थित होते.
    यावेळी बापताना माजी कुलपती नांलदा विद्यापीठ पद्मभूषण डॉ. विजय भटकर म्हणाले कि, गावाचे नामकरन या मागे एक उद्देश हे क्वचित घडते. एक आदर्श गावाचे उदाहरण म्हणजे रामेश्वर असून या गावाला विश्वनाथाचा आशीर्वाद आहे. असा बदल गावागावात होणे काळाची गरज असून
गावा गावात मोठा बदल झाला तर हे भारत आदर्श राष्ट्र बनेल.
    या वेळी बोलताना आमदार श्री. रमेश का. कराड म्हणाले कि, रामेश्वर गावाचे भाग्य आहे. आज सुवर्णं अक्षराने लिहावा असा  दिवस आहे. डॉ कराड यांनी द्यानाची मंदिरे उभा केली. डॉ कराड आपल्या गावचे सुपुत्र हे आपल्या गावचे भाग्य आहे. प्रत्येक सना मध्ये ते गावात रममान होतात. मानवता तीर्थ काय असते हे डॉ कराड यांनी दाखवून दिले.
       जगभर नाव कामावलं, विश्व निर्माण केले कधी याचा गर्व केले नाही. आपण सर्व भाग्यवान आहोत आपण रामेश्वर चे भूमिपुत्र आहोत. सर्वानी गावाचे नाव लोकिक वाढवण्याचे काम केले पाहिजे. देव अण्णा भाऊ मध्ये पहायला शिका. सरांच्या स्वनातील गाव साकरण्याचे काम ओपन सर्व जण करू या.
   स्वागत पर भाषणात बोलताना  डॉ मिलिंद कराड म्हणाले कि, ऐतिहासिक दिवस आहे, या गावाच्या नावा मध्ये मोठी ताकत आहे. एवढे मोठे कार्य डॉ विश्वनाथरावजी कराड यांच्या हातून होत आहे. देवदेवता व जेष्ठ मंडळीचा आशीर्वाद आहे. सरांनी 1996 साली विश्व धर्माची संकल्पना मांडली आणि आज ती आमलात आली आहे. हे कार्य 100 वर्ष अखंड पणे सुरु राहील. हा वसा कराड कुटुंबियांनी अखंड पणे चालू ठेवावा हेच डॉ कराड यांचं स्वप्न आहे.
    ज्येष्ठ कवी, लेखक व वक्ते डॉ. संजय उपाध्ये या वेळी बोलताना म्हणाले कि,
शिक्षण हे आदर्श ठेऊनच करता येतो. माणसाने कस घडावे हा आदर्श निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे डॉ विश्वनाथ  राव कराड आहेत. प्रत्येकाने एकच काम करा आपल्या गावाचे नाव मोठे करा.
    या वेळी संजय उपाध्ये यांनी आपल्या कविते मधून रामेश्वर गावची महती व्यक्त केली.
   नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू
डॉ. एस. एन. पठाण म्हणाले कि, डॉ कराड यांच्या मार्गदर्शना खाली या गावातील हिंदू मुस्लिम बांधवानी एकत्रित येऊन मंदिर आणि मज्जीद उभा केली. अयोध्यामध्ये राम मंदिर व मज्जीदचे पुंरनिर्माण कशा पद्धतीने व्हावे याची संकल्पना डॉ कराड यांनी मांडली होती त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला व याच पद्धतीने अयोध्यामध्ये राम मंदिर ची उभारणी झाली आहे. या गावची राज्य शासन निश्चिन्त दखल घेईल.
    या वेळी अध्यक्षीय भाषण व शुभाशीर्वाद देते वेळी माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले कि हा कार्यक्रम पूर्व नियोजित नाही. आपले भाग्य आहे. संत व्यक्तीचा जगातील म्हणून शास्त्रज्ञ म्हणजे विजय भटकर यांच्या हस्ते ज्योत विश्व् भरात जावी. सर्व जण वंदन करतील असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ भटकर यांच्या हस्ते विश्व शांतीची ज्योत पेटवल्या जातेय आणि नवं शास्त्रज्ञ डॉ विश्वजीत नागरगोजे आणि सहकारी यांचेकडे विश्वशांतीची ज्ञान ज्योत यांच्या कडे हस्तांतरण करण्यात येतेय.
      रामेश्वर गावात मी 10 वी ला शिकताना विहीर घेताना यज्ञ कुंड सापडले. कधी काळी हे रामेश्वर यज्ञ भूमि असावी
एवढा मोठा या भूमीत झालेला बदल, उभी राहिलेली मंदिरे, मज्जीद, बुद्ध विहार,  म्हणजे याच हे प्रतीक आहे, ही ज्ञान यज्ञ भूमी आहे.
     बालपनी सद्बुद्धी दे, दुसऱ्या बद्दल चांगले विचार येऊ दे, हे विचार मनात येत होते.
     कोरोनात सर्व जण लपून बसले होते, चायनाची 20 टक्के शक्ती बाहेर आले
कुठल्याही देशाचा नेता गर्विष्ठ झाला कि भानगड होते. जगभरातील सर्व नेत्यांना सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करतो आहे. हा संदेश जगभरात जाईल. जाती धर्माचा शाप या जगाला लागला आहे. वारकरी  संपर्दयी  माणुसकीचे धडे देतो.
     यावेळी त्यांनी रामेश्वर गावातील त्यांनी  बालपनीच्या आठवणीला उजाळा दिला.
    या वेळी मान्यवरांच्या हस्ते विश्वशांतीची ज्ञान ज्योत प्रज्वलीत करून डॉ. विश्वजीत नागरगोजे आणि सहकारी यांचेकडे  हस्तांतरीत करण्यात आले तसेच  सन्माननीय प्रमुख पाहण्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
    या वेळी सर्वांच्या उपस्थिती मध्ये रामेश्वर चे नाव विश्वधर्मी मानवतातीर्थ- रामेश्वर (रुई) नामकरण
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद पांडे, प्र. कुलगुरु, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांनी सूत्र संचालन  प्रा. मिलिंद पात्रे, सह अधिष्ठाता, पीस स्टडीज, एमआयटी बल्ई यांनी तर आभार प्रदर्शन सौं स्वाती चाटे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!