Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

ज्ञानराधा कॉ ऑपरेटीव्हच्या विरोधात ठेवीदारांचा वाणिज्य दावा दाखल

ज्ञानराधा कॉ ऑपरेटीव्हच्या विरोधात ठेवीदारांचा वाणिज्य दावा दाखल

अंबाजोगाई :-
    ज्ञानराधाच्या मल्टीस्टेट कॉ- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडच्या  विरोधात ठेवीदारांच्या वतीने वाणिज्य दावा दाखल करण्यात आला असून यामुळे ठेवीदारांना न्याय मिळण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.
   अंबाजोगाई येथील मा. जिल्हा न्यायालयात ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड यांचे विरुद्ध अंबाजोगाई येथील तब्बल 157 ठेवीदारांनी त्यांच्या ठेवी व्याजासहीत आजच्या तारखेपर्यंत ठेवीदारांना मिळाव्यात म्हणून ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड चे केंद्रीय निबंधक दिल्ली तसेच सहकार आयुक्त पुणे, समृत जाधव अवसायक बीड व इतर अधिकारी व संचालक असे पंचेविस जणांच्या विरोधात तब्बल 16 कोटी 56 लाख रुपये रक्कम ही ज्ञानराधाची मालमत्ता विक्री करून रक्कम परत देणाऱ्या तारखेपर्यंत व्याजासहीत देय रक्कम वादी यांना “देण्यात यावी तसेच सुरेश कुटे व इतर संचालकाच्या पोलीस विभागाने न जप्त केलेल्या मालमत्ता अवसायकाने त्वरित जप्त करण्यात याव्यात असा वाणिज्य दावा क्र. 9/ 2025 जिल्हा न्यायाधीश साहेब मा. संजश्री घरत मॅडम यांच्या न्यायलात दाखल केला असून प्रतिवादींना समन्स सुद्धा तामिल झाली आहेत.
    या प्रकरणात ठेवीदारांची बाजू अॅडवोकेट अशोक विनायकराव कुलकर्णी (माडीत आहेत माजी शासकीय अभियोक्ता) त्यांना वैजनाथ वांजरखेडे व पांचाळ मदत करीत आहेत. या मध्ये ठेवीदारांना न्याय मीळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!