आम्हाला पैसे का देत नाहीस असे म्हणून महिलेच्या गळ्यावर दीर व पुतण्याने कुऱ्हाडीने वार करून केला निर्घृण पणे खून महाराष्ट्र दिनी परळी तालुक्यातील घटना
आम्हाला पैसे का देत नाहीस असे म्हणून महिलेच्या गळ्यावर दीर व पुतण्याने कुऱ्हाडीने वार करून केला निर्घृण पणे खून महाराष्ट्र दिनी परळी तालुक्यातील घटना
परळी
आम्हाला पैसे का देत नाहीस असे म्हणून चंद्रकांत धुराजी कावळे या महिलेच्या गळ्यावर स्वतःचा दीर व पुतण्याने कुऱ्हाडीने वार करून निर्घृण पणे खून केल्याची घटना काल महाराष्ट्र दिनी परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी या ठिकाणी घडली.
या विषयी मयत परीमला बाई भागूराव कावळे यांचा मुलगा विष्णू कावळे यांनी सिरसाळा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हंटले आहे कि, मला आई परीमाळाबाई वय 70 वर्षे (मयत), पत्नी रत्नमाला, एक मुलगी मंजीरी असा परिवार असुन मी मुलीचे शिक्षणासाठी लातुर येथे असतो. माझे वडील भागुराम कावळे हे मागील दोन वर्षापुर्वी मयत झाले असुन गावाकडे माझी आई परिमाळाबाई हि एकटीच राहत होती. मी आदर्श उच्च माध्य. विद्यालय, बनसारोळा ता. केज येथे शिक्षक म्हणुन काम करतो व माझे कुटुंबाची उपजिवीका भागवितो.
मला एक चुलते नामे धुराजी संतोबा कावळे असे असुन त्यांचा मुलगा चंद्रकांत धुराजी कावळे असे असुन चुलत भाऊ चंद्रकांत धुराजी कावळे हा माझी आई परिमाळा कावळे यांना नेहमी दारु पिण्यासाठी पैसे मागत असे तेंव्हा माझी आईने त्यास पैसे देण्यास नकार दिल्यावर माझा चुलता धुराजी संतोबा कावळे हा माझे आई परिमाळा हिस म्हणायाचा तुझा मुलगा नोकरीला आहे तु चंद्रकांतला दारु प्यायला पैसे का देत नाहीस असे म्हणुन दोघे मिळून पैशाची मागणी करुन माझी आई परिमाळा हिला मारहाण करत होते व पैसे नाही दिले तर तुला जिवे मारुन टाकु अशी धमकी देत होते. मी गावाकडे आल्यानंतर माझी आई परिमाळा हि मला वरील दोघांनी दिलेला त्रास सांगत होती. त्यानंतर मी, माझी चुलती, आमचे गावातील सरपंच, व इतर लोकांनी चुलता नामे धुराजी संतोबा कावळे व चुलत भाऊ चंद्रकांत धुराजी कावळे यांना समजावुन सांगीतले होते. त्या दोघांनी दोन दिवस ऐकल्यावाणी केले आणि परत माझे आईला त्रास देणे चालु केले. माझी आई परिमाळा हिला माझे चुलते धुराजी कावळे व चुलत भाऊ चंद्रकांत कावळे हे दोघे परत पैशाची मागणी करुन जिवे मारण्याची धमकी देत असल्याने मी दि.28/04/2025 रोजी माझे गावाकडे कावळ्याचीवाडी येथे येवुन राहिलो. तेंव्हा चुलता धुराजी कावळे व चुलत भाऊ चंद्रकांत कावळे या दोघांनी मला म्हणाले तु नौकरीला आहेस तुझी आई एकटीच आमचे शेजारी राहते तु आम्हाला दर महिन्याला पैसे देत जा नाही दिल्यावर तु घरी नसताना तुझी आई परिमाळा हिला जिव मारुन टाकुत असे म्हणून धमक्या देत होते. त्यावरुन मी आमचे गावातील जगन्नाथ राजेभाऊ कावळे, राम सुखदेव खडके व इतर लोकांना बोलावुन चुलते धुराजी कावळे व चुलत भाऊ चंद्रकांत कावळे यांना समजावुन सांगण्यासाठी सांगतले होते. त्यांनी चुलते धुराजी व चुलत भाऊ चंद्रकांत यांना समजावुन सांगीतले होते.
दि.01/05/2025 रोजी पहाटे साडे पाच वाजणेच्या सुमारास चुलत भाऊ चंद्रकांत घुराजी कावळे व चुलते धुराजी संतोबा कावळे असे दोघे माझ्याकडे आले व मला म्हणाले तुझी आई घरी एकटीच असते तु नौकरीला आहेस तु आम्हाला पैसे दे नाहीतर तु घरी नसल्यावर आम्ही तुझ्या आईला जिवे मारुन टाकु अशी धमकी दिल्यावर मी त्यांना समजावुन सांगीतले की, आज झेंडावंदन आहे मी झेंडावंदन करुन आल्यावर आपण बसुन बोलु असे म्हणुन मी सकाळी सहा वाजणेच्या सुमारास झेंडावंदनसाठी बनसारोळा येथे गेलो. त्यानंतर मला दुपारी दोन वाजणेच्या सुमारास आमचे गावचे जगन्नाथ कावळे यांचा फोन आला व सांगीतले की, चंद्रकांत धुराजी कावळे याने तुझी आई परीमाळा हिचे डोक्यात कुऱ्हाडीचे घाव करुन जिवे मारले आहे. असे सांगीतल्याने मी घाईगडबडीने गावाकडे आलो तेंव्हा माझ्या घरासमोर माझी आई परिमाळाबाई वय 70 वर्षे हि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली व तिच्या मानेवर खोलवर कुऱ्हाडीचे घाव करुन, ती मयत आवस्थेत पडलेली दिसली.
या प्रकरणी विष्णू कावळे यांचे फिर्यादी वरून धुराजी संतोबा कावळे व चुलत भाऊ चंद्रकांत धुराजी कावळे यांचे विरुद्ध सिरसाळा पोलीस स्टेशन ला रीतसर फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक दहिफळे हे अधिक तपास करत आहेत.
