Thursday, May 8, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून, पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला 

पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून, पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला 

अंबाजोगाई
    स्वतःच्या पोटच्या मुलानेच आपल्या  जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्का दायक घटना अंबेजोगाई तालुक्यातील येल्डा या ठिकाणी घडल्याने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
   बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होता दिसत नसून अंबाजोगाई तालुक्यातील येलडा या ठिकाणी आज पहाटे दीड ते दोनच्या सुमारास अमृत भानुदास सोन्नर या 42 वर्षीय मुलाने घरातच चोत्राबाई भानुदास सोन्नर या स्वतःच्या 70 वर्षीय जन्मदात्या आईचा दगडाने ठेचून खून केला आणि पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आईचे प्रेत रस्त्यावर आणून टाकले.
     याचवेळी गावातील काय मंडळींनी हा प्रकार पाहून त्या मुलास रंगेहात पकडले आणि या घटनेची खबर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. ग्रामीण पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून या महिलेची प्रेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हालवण्यात येत आहे. या मुलाने स्वतःच्या आईचा खून का व कशासाठी केला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून लवकरच ते समोर येईल. या घटनेने पुन्हा एकदा अंबाजोगाई तालुका हादरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!