कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची पदावरून हकालपट्टी
कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची पदावरून हकालपट्टी
बीड
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदेंना पदावरून पुन्हा हटवण्यात आले आहे. कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा ठपका ठेवत पुन्हा त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आसुन बीडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. २ दिवसांपूर्वी डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी रेड टाकली होती. यावेळी १० पीडितांची सुटका करत ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांचे नाव नव्हते. पण हे कलाकेंद्र तेच चालवत असल्याचा ठपका आहे. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. त्यांना पुन्हा पदावरून हटवण्यात आले.
केज तालुक्यातील उमरी येथील महालक्ष्मी कला केंद्रावर कारवाई झाल्यानंतर रत्नाकर शिंदेंना पदावरून हटवण्यात आले. यापूर्वी देखील कला केंद्र चालवत असल्यानेच त्यांना पदावरुन हटवण्यात आले होते. मात्र पुन्हा काही दिवसांनी त्यांची पदावर नियुक्ती झाली होती. तरीही कला केंद्राचा व्यवसाय चालूच होता.
यानंतर दोन दिवसांपूर्वी केज पोलिसांनी कला केंद्रावर रेड मारली. यावेळी कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. यानंतर शनिवारी शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाने रत्नाकर शिंदे यांना पदावरून हटवले असून या निर्णयाने शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची पक्षावरची पकड ढिली होताना दिसत आहे.
