साखरपुड्यातच नवरीने मारली प्रियकराला मिठी, आय टी अधिकारी असलेल्या नवरदेवाने जीवन संपवलं
साखरपुड्यातच नवरीने मारली प्रियकराला मिठी, आय टी अधिकारी असलेल्या नवरदेवाने जीवन संपवलं
नाशिक
साखरपुड्यातच नवरीने आपल्या प्रियकराला मिठी मारल्याने नवरीचं प्रेम प्रकरण तिच्या होणाऱ्या नवऱ्याला समजलं, होणाऱ्या बायकोचं अफेअर समजताच त्याने लग्नाला नकार दिला. मात्र, होणाऱ्या नवरदेवाने लग्नाला नकार दिल्यानंतर नवरीने त्याला “लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन”, अशी धमकी दिली. नवरीकडून येणाऱ्या धमकीमुळे नवरदेव इन्कम टॅक्स अधिकारी नैराश्यात आला आणि त्याने आपल आयुष्य संपवल्याची घटना नाशिक मध्ये घडली.
या प्रकरणी नाशिकमध्ये धमकी देणाऱ्या नवरीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हरेकृष्ण पांडे असं आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. तो इन्कम टॅक्स अधिकारी होता.
या प्रकरणाची अधिकची माहिती अशी की, नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या आयकर अधिकारी हरेकृष्ण पांडे यांचा उत्तर प्रदेशातील एका मुलीसोबत साखरपुडा झाला होता. मात्र हरे कृष्णा पांडे यांच्या साखरपुड्यातच त्यांच्या होणाऱ्या पत्नीने एका तरुणास मिठी मारली नेमका हा तरुण कोण असा प्रश्न पांडे यांना पडला. मात्र खरं कारण पांडे यांच्या समोर आला आणि त्यांच्या
त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. साखरपुड्यामध्ये मिठी मारणारा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून पांडे यांच्या होणाऱ्या पत्नीचा प्रियकर असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. उत्तर प्रदेशमधील एका मुलीसोबत हरे कृष्ण पांडे यांच लग्न ठरले होते मात्र साखरपुड्याच्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे पांडे हे तानावात होते. होणाऱ्या पत्नीला मिठी मारणारा तिचा प्रियकर असल्याची माहिती हरेकृष्ण पांडे यांना समजताच त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. मात्र होणाऱ्या पत्नीने लग्न कर नाहीतर हुंडा मागितल्याच्या गुन्ह्यात तुला अडकवेल अशी धमकी दिली. सततच्या त्रासाला कंटाळून आयकर अधिकारी असलेल्या हरेकृष्ण पांडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हरे कृष्ण पांडे यांच्या आत्महत्या नंतर नाशिकच्या अंबड पोलिसांनी सखोल तपास करत होणारी पत्नी मोहिनी पांडे, तिचा प्रियकर सुरेश पांडे आणि त्याचा साथीदार मुनेंद्र पांडे या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सध्या फरार असलेल्या या तिघांचा नाशिक पोलिसांकडून शोधू सुरू आहे.
साखरपुड्यातच नवरीने प्रियकराला मिठी मारल्याने प्रेमप्रकरण उघड झालं. त्यानंतर नवरदेव हरेकृष्ण पांडे यांनी तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. मात्र, “लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन”, अशा धमक्या नवरीकडून सातत्याने येत होत्या.
हरेकृष्ण पांडे यांचा साखरपुडा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला होता. साखरपुड्यात होणाऱ्या नवरीचा प्रताप समोर आल्यानंतर नाशिकमध्ये कार्यरत असलेला नवरदेव हरेकृष्ण पांडे मानसिक तणावात होता. दरम्यान, लग्नाच्या दिवशीच हरेकृष्ण पांडे यांनीआत्महत्या केली आहे. उत्तमनगर परिसरात गळफास लावून घेतलाय.
बायको होणाऱ्या युवतीकडून सतत ब्लॅकमेल आणि मानसिक त्रास झाला. त्यानंतर हरेकृष्ण पांडे यांनी टोकाचं पाऊल उचललंय. याप्रकरमी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. प्रेम, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या सावटाखाली एका अधिकाऱ्याचे आयुष्य संपले आहे.