ताज्या घडामोडी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते – राजकिशोर मोदी*

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते – राजकिशोर मोदी

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते असे मत अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. ते आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करतांना बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत मनोज लखेरा ,महादेव आदमाणे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ राजेश इंगोले, सुनील वाघाळकर , भागवत मसने, अमोल लोमटे, धम्मा सरवदे, सुभाष पानकोळी, सुधाकर टेकाळे, गणेश मसने, दत्ता सरवदे, विजय रापतवार, अंकुश हेडे, शाकेर काझी, अकबर पठाण, गोविंद पोतंगले,रोहन कुरे, आकाश कऱ्हाड, खलील जाफरी, ताहेर भाई, अस्लम शेख,उज्जेन बनसोडे, मुन्ना पठाण, सुशील जोशी, शरद काळे, अमित परदेशी,गुड्डू जोगदंड, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची १९६ वावी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी व शहर वासीयांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले यांनी साक्षरतेचा मूलमंत्र जगाला दिला . वर्णभेद , जातीभेदाच्या अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले . अशा या थोर विभूतीची आज १९६ वी जयंती संपूर्ण देशात साजरी केल्या जात आहे. शिक्षणाचा हक्क व अधिकाराची लढाई लढतांना त्यांना खंबीर अशी साथ सावित्रीबाई फुले यांनी दिली असेही मत राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
महात्मा फुले हे लहानपणापासूनच अभ्यासू व जिज्ञासू वृत्तीचे होते .ब्रिटिशांची राजवट उलथून टाकण्याचे विचार त्यांच्या मनात लहानपणापासूनच लोळत होते . त्यांनी लहुजी साळवे यांच्या कडून शारीरिक शिक्षनाचे धडे देखील घेतले होते असे विचार राजकिशोर मोदी यांनी प्रकट केले . चूल आणि मूल याच्या जोखडातून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य झिजविले. त्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांना आपले गुरू मानत असत. आज समाजात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ताठ मानेने फिरते आहे ते केवळ माता सावित्रीबाई आणि ज्योतीबा फुले यांच्या मुळेच अशी भावना राजकिशोर मोदी यांनी आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करताना व्यक्त केली .
तळगळातून आलेल्या जोतीराव फुले यांच्यासारख्या विचारवंताला सामाजिक विषमतेचे भीषण स्वरूप जवळून पाहिला मिळाले. वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद यावर आधारित सर्व सामाजिक आर्थिक विषमतांचा नायनाट करून सर्वांना समान वागणूक मिळावी हा त्यांचा ध्यास होता. दलितांना शोषितांना व स्त्रियांना समता द्यायची तर परोपकार भावनेतून नव्हे तर त्यांचा तो हक्क आहे अशी भावना महात्मा फुले यांची होती. स्त्री असो वा पुरुष माणसाला माणसाचे हक्क मिळालेच पाहिजेत असा कायमस्वरूपी ध्यास ज्योतिबांचा होता असेही मत राजकिशोर मोदी यांनी अभिवादन प्रसंगी व्यक्त केले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय त्याचबरोबर सांस्कृतिक उद्बोधनामुळेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते अशी स्पष्ट भावना राजकिशोर मोदी यांनी ज्योतिबा फुले यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करताना व्यक्त केली. शेवटी महात्मा फुले यांना सर्वोच्च अशा भारतरत्न या उपाधीने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!