टोल भरणाऱ्यांसाठी गूड न्यूज! येत्या 8 ते 10 दिवसात नवीन धोरण जाहीर करण्याची केद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा
टोल भरणाऱ्यांसाठी गूड न्यूज! येत्या 8 ते 10 दिवसात नवीन धोरण जाहीर करण्याची केद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा
मुबंई
रस्ते टोलमुक्त करण्याच्या शक्यतेबद्दल बोलताना केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आसून टोल भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही नव्या धोरणावर काम करत आहोत आणि ते 8 ते 10 दिवसांत हे धोरण जाहीर करून टोलची रक्कम शंभर टक्के कमी केली जाईल असा शब्द गडकरी यांनी दिला आहे. त्यामुळे टोल भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नितीन गडकरी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती मधे ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, “टोल भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरणावर काम सुरू आहे. ते 8 ते 10 दिवसांत जाहीर केले जाईल. टोलची रक्कम 100 टक्के कमी केली जाईल. मी आत्ता तुम्हाला एवढेच सांगू शकतो.” गडकरींच्या या घोषणेमुळे वाहनधारकाना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 10 दिवसांत गडकरी टोलसंदर्भात मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
“मी बांधलेल्या रस्त्यावर मलाच दोनदा दंड”
यावेळी गडकरी यांनी सर्वांसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे याचे एक रंजक उदाहरण देखील दिले. वाहतुक नियमांचे महत्त्व अधोरेखित करताना गडकरी म्हणाले की, “मुंबईत मी बांधलेल्या एका रस्त्यावर माझेच दोनदा चलान कपण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर त्यांच्या कारला दोनदा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ते म्हणाले की, “मी वांद्रे-वरळी सी लिंक बांधला. माझी मुंबईत एक गाडी आहे. त्यासाठी माझे दोनदा चला कापले आहे. नियमांपासून कोणीही पळून जाऊ शकत नाही. कॅमेरा सर्वकाही कैद करतो. मला 500 रुपये द्यावे लागले. लोक अनेकदा दंडाबद्दल तक्रार करतात, परंतु त्यांनी नियमांचे उल्लंघन करू नये. दंड महसूल वाढविण्यासाठी नाही,” असे यावेळी बोलताना गडकरी म्हणाले.
“रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न”
रस्ते अपघात 50 टक्के कमी करण्याच्या मंत्रालयाच्या उद्दिष्टाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की” दुर्दैवाने आपण हे लक्ष्य साध्य करू शकलो नाही. अपघातांचे कारण रस्ते आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकी आहे. जी वाहने बनवली गेली आहेत ती खूप चांगल्या स्थितीत आहेत. रस्ते अभियांत्रिकीमध्ये काही त्रुटी होत्या. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आम्ही 40,000 कोटी रुपये खर्च केले. राहवीर योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना 25,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. जखमींचा खर्च भागवण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत,” असे गडकरी यांनी सांगितले.
