मराठी पत्रकार परिषद हीच आपली ओळख- एस. एम. देशमुख बीडमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
मराठी पत्रकार परिषद हीच आपली ओळख- एस. एम. देशमुख
बीडमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
बीड/ प्रतिनिधी
ऐंशी वर्षाचा इतिहास असलेली मराठी पत्रकार परिषद हीच आपली ओळख असून या परिषदेला मोठा इतिहास आहे. पत्रकारांच्या प्रश्नांबरोबरच समाजाच्या प्रश्नाकडेही या परिषदेने कायम लक्ष दिलेले आहे. यापुढेही पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच सामाजिक प्रश्नावरही मराठी पत्रकार परिषद आंदोलन करेल अशी ग्वाही मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी बीड येथील शासकीय विश्रामगृहावर बीड जिल्हा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्रतिम मीडियाचे प्रमुख तथा दैनिक सामनाचे माजी संभाजीनगर आवृत्तीचे संपादक अनिल फळे, दैनिक सुराज्यचे संपादक सर्वोत्तम गावरस्कर ,डिजिटल मीडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर, जिल्हा सरचिटणीस सुभाष सुतार, विभागीय सचिव रवी उबाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना एस.एम. देशमुख म्हणाले की पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्याबरोबरच जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. बीड मधील वाईट गोष्टी शिवाय बीडमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. हे ही पत्रकारांनी पुणे, मुंबईच्या पत्रकारांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. या जिल्ह्यात अनेक खेळाडू राष्ट्र पातळीवर गाजलेले आहेत. अनेक तरुण तरुणी देश पातळीवर कामगिरी करतात. मात्र त्यांची चर्चा होताना दिसत नाही. अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. आपल्याला जाणीवपूर्वक जिल्ह्याची प्रतिमा सुधारावी लागेल असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अनिल फळे यांनी आपली भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके यांनी केले. तर आभार प्रदर्शन संभाजीनगर विभागाचे सचिव रवी उबाळे यांनी केले .या बैठकीला राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संजय हंगे, बीड जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर, जिल्हा सरचिटणीस सुभाष सुतार, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत, जिल्हा उपाध्यक्ष जुनेद बागवान, चंद्रकांत राजहंस, अविनाश कदम ,कादर मकरानी, यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून त्यांचाही सत्कार मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अविनाश कदम यांनी आष्टी तालुका संघाच्या वतीने प्रतिमा, कॅलेंडर, शाल, श्रीफळ देऊन एस. एम. देशमुख यांचा गौरव केला. या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष मधुकर तौर, हमिदखान पठाण, बीड तालुका सरचिटणीस प्रचंड सोळंके,अनिल अष्टपुञे आदींची उपस्थिती होती.
