डुक्कर आडवं आलं, कार टँकरला धडकली, एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने अक्ख कुटुंब संपलं
डुक्कर आडवं आलं, कार टँकरला धडकली, एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने अक्ख कुटुंब संपलं
वर्धा
डुक्कर आडवे आल्यामुळ कारचे नियंत्रण सुटले अन् कार टँकरला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून अपघात इतका भीषण होता की माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. उपचारावेळी बाप-लेक दगावले.
वर्धा येथील समुद्रपूर वर्धा मार्गावरील तरोडा शिवारातील या अपघातात जखमी झालेल्या वडिलांना नागपूरला आणि मुलीला सेवाग्राम येथे उपचरासाठी दाखल केले होते. पण उपचारावेळी दोघांचीही प्राण ज्योत मालवली. प्रियंका प्रशांत वैद्य (वय 37),प्रियांश प्रशांत वैद्य (वय 8 वर्ष ),प्रशांत मधुकर वैद्य (43 वर्ष ) व माही प्रशांत वैद्य (3 वर्ष ) अशी मृतकांची नावे आहेत.
प्रशांत मधुकर वैद्य हे कारने वर्ध्याला येत होते, त्यावेळी रात्री एक वाजताच्या आसपास अपघात धाला. वैद्य यांच्या कारला अचानक डुक्कार धडकले त्यामुळे कारवरील ताबा सुटला. कार थेट जाऊन टँकरला धडकली. या अपघातामध्ये प्रियंका आणि प्रियांश यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेले प्रशांत वैद्य आणि माही यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.
