Monday, April 7, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा डोक्यात गोळी मारून आत्महत्याचा प्रयत्न, डोक्याची कवटी फोडून गोळी आरपार, तुकडे मेंदूत पसरले, प्रकृती चिंताजनक

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा डोक्यात गोळी मारून आत्महत्याचा प्रयत्न, डोक्याची कवटी फोडून गोळी आरपार, तुकडे मेंदूत पसरले, प्रकृती चिंताजनक

लातूर 

   लातूर महानगरपालिकेचे शिस्तप्रिय आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आसून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

  बाबासाहेब मनोहरे यांनी लातूर येथील  शासकीय बंगल्यावर रात्री 11.15 च्या सुमारास रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडली आसुन यात बाबासाहेब मनोहरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर सध्या लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  बाबासाहेब मनोहरे हे शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबीयांसोबत जेवले, गप्पा मारल्या. त्यानंतर बाबासाहेब मनोहरे हे खोलीत गेले आणि त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय खोलीत गेले, त्यावेळी बाबासाहेब जखमी अवस्थेत दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब मनोहरे यांनी डोक्यात जी गोळी झाडून घेतली होती, ती उजव्या बाजूने आरपार निघाली आहे. या गोळीने बाबासाहेब मनोहरे यांची कवटी फोडली आणि गोळी डोक्यातून बाहेर पडली. बाबासाहेब यांच्या मेंदूच्या काही भागालाही इजा पोहोचली आहे. तुटलेल्या कवटीचे काही तुकडे बाबासाहेब मनोहरे यांच्या मेंदूत पसरले आहेत. यासाठी डॉक्टर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार होते. ही शस्त्रक्रिया कशी पार पडली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु, बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. डॉक्टरांकडून बाबासाहेब मनोहरे यांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बाबासाहेब मनोहरे हे कठोर शिस्तीचे आणि स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. यापूर्वी त्यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काम केले होते. ते लातूर महानगरपालिकेत सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त होते. नंतर त्यांना बढती मिळून ते महानगरपालिका आयुक्त झाले होते. बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. त्यांनी लातूर महानगरपालिकेचा कारभार अत्यंत उत्तम पद्धतीने सांभाळला होता. बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी समजताच पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्याद्री रुग्णालयाकडे धाव घेतली होती. लातूर पोलिसांनी बाबासाहेब मनोरे यांच्या घरी जाऊनही घटनेचा पंचनामा केला. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!