अंबाजोगाई शहरात बाबळीच्या झाडास 24 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अंबाजोगाई शहरात बाबळीच्या झाडास 24 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
आंबजोगाई
अंबाजोगाई शहरातील रिंगरोड लगत असलेल्या शेता मधील बाबळीच्या झाडास एका 24 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आज दुपारी घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील धावडी येथील रहिवासी असलेल्या रामधन अशोक नेहरकर या 24 वर्षीय युवकाने आज दुपारी 3 च्या सुमारास शहरा बाहेरून जाणाऱ्या रिंगरोड लगत असलेल्या आबाचा ढाबा या धाब्याच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील बाबळीच्या झाडास गळफास घेतला व आपली जीवन यात्रा संपवली.
पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शना खाली पो हे कॉ आवले व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले असून रामधन चे शव शव विच्छेदन करण्या साठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात येत आहे, आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून ते लवकरच स्पष्ट होईल.
