दोन्ही लेकीवर हळद लागण्यापूर्वीच काळाचा घाला, मुख्यमंत्री व पंतप्रधाना कडून आर्थिक मदतीची घोषणा
दोन्ही लेकीवर हळद लागण्यापूर्वीच काळाचा घाला, मुख्यमंत्री व पंतप्रधाना कडून आर्थिक मदतीची घोषणा
नांदेड
मजुरी वर काम करण्या साठी महिलांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली सह विहिरीत कोसळले. यात मे महिन्यात लग्नाच्या उंबरठ्या वर चढणाऱ्या 2 मुली सह आठ महिलांचा मृत्यू झाला असून मुख्यमंत्री व पंतप्रधाना कडून आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
काल नांदेडमधील आलेगाव शिवारात झालेल्या अपघातात धुरपता सटवाजी जाधव (वय १८) आणि सिमरन संतोष कांबळे (वय १८) अशी दोन्ही मयत मुलींचे नावे आसून हळद लागण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होतं आहे. धुरपता जाधव आणि सिरमन कांबळे ह्या दोघी एकाच गावातील आणि गरीब कुटुंबातील होत्या. महिना भरापूर्वी दोघींची सोयरीक झाली होती
. मे महिन्यात त्यांच्या लग्नाची तारीख काढणार होते. लग्नाला पैसे लागणार म्हणून दोन्ही मुली हातभार लावण्यासाठी आई वडिलांसोबत शेत मजुरीला जात होते. २५० रुपये त्यांना मोबदला देखील मिळायचा. लेकीच्या लग्नामुळे कांबळे आणि जाधव कुटुंबीय आनंदीत होतं. मात्र, दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबाच्या आनंदवर विरजण पडलं.
नेमकं काय आहे प्रकरण
शेतात कामासाठी महिला शेतमजूर नेत असताना टॅक्टर विहिरीत कोसळून सात महिला ठार झाल्याची घटना घडली. नांदेड आणि हिंगोलीच्या सीमेवर असलेल्या आलेगाव येथील दगडोजी शिंदे यांच्या शेतात कामासाठी एकूण १० महिला आणि पुरुष शेतमजूर ट्रॅक्टरमधून जात होते. ताराबाई जाधव (वय ३५), धुरपता जाधव (वय १८), सिमरन कांबळे (वय
१८), सरस्वती लखन भूरड (वय २५), चऊत्राबाई माधव पारदे (वय ४५), मीना राऊत (वय २५ ) आणि ज्योती सरोदे (वय ३०) अस मयतांची नावे आहेत.
मयत हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावातील रहिवासी होते. हृदयद्रावक बाब म्हणजे ताराबाई जाधव आणि धुरपता जाधव ह्या दोघी मायलेकी होत्या. चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत पडले. ट्रॅक्टर उलटत असताना उडी मारून ट्रॅक्टर चालक मात्र पसार झाला. विहिरीत पाणी असल्याने पूर्ण ट्रॅक्टर विहिरीत बुडाले. ट्रॅक्टर पडले त्यावेळी आसपास असलेल्या काही शेतकऱ्यांनी पुरभाबाई कांबळे, पार्वतीबाई बुरड आणि सटवाजी जाधव यांना सुखरूप बाहेर काढले. सात महिला ट्रॅक्टर खाली अडकल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर सातही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मुख्यमंत्री व पंतप्रधाना कडून आर्थिक मदतीची घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि मुख्यमंत्री मदत निधीतून पीडितांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.
