२ महिन्यांपूर्वीच विवाह बद्ध झालेल्या नवं दाम्पत्याने संपवलं जीवन
२ महिन्यांपूर्वीच विवाह बद्ध झालेल्या
नवं दाम्पत्याने संपवलं जीवन
बीड
२ महिनाभरापूर्वीच विवाह झाला असताना अचानक या नव दाम्पत्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवल्यामुळे बीड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बीडच्या केतुरा येथे शुभांगी अक्षय गालफाडे या नवविवाहित तरूणीने २ एप्रिल ला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान, राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तर, दुसऱ्या दिवशी पती अक्षय गालफाडे याने देखील पहाटे पाचच्या दरम्यान, लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
२ महिन्यांपूर्वीच लग्न
या जोडप्याचे २ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर हे जोडपं पुण्यात राहायला गेले होते. मात्र, काही दिवसानंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. वाद झाल्यानंतर हे जोडपे पुन्हा आपल्या मुळगावी केतुरा येथे परतले. केतुरा परतल्यानंतर पुन्हा त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. त्यानंतर तरूणीने आधी आयुष्य संपवण्याचे ठरवले आणि नंतर तरूणानेही गळफास घेत आत्महत्या केली.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रूग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तरूणाने आत्महत्या का केली?
शुभांगीचा मृत्यू झाल्यानंतर अक्षय गालफाडे यांना पत्नीच्या कुटुंबाने त्याला धारेवर धरलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने गावातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात दोघांनी आत्महत्या का केली? याचा शोध सुरू असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.