अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेस मार्च २०२५ अखेर ६ कोटी ६२ लक्ष रुपयांचा करपूर्व नफा
अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेस मार्च २०२५ अखेर ६ कोटी ६२ लक्ष रुपयांचा करपूर्व नफा
वर्ष अखेर ५७३ कोटींच्या ठेवी जमा करत ०% नेट एन पी ए राखण्यात बँकेस यश
अंबाजोगाई (प्रतिनिधी ):- अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने सन २०२४-२०२५ मधील केलेल्या उत्तम कामकाजामुळे ३१ मार्च २०२५ अखेर बँकेने ५७३ कोटींच्या ठेवी जमा करत वर्षाखेरीस ०% नेट एन पी ए राखण्यात यश मिळवले आहे. त्याबरोबरच मार्च २०२५ अखेरीस बँकेस ६ कोटी ६२ लक्ष एवढा करपूर्व नफा मिळवल्याचे बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. बँकेने मिळवलेले हे यश बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, ठेवीदार, ग्राहक तसेच सभासदाच्या विश्वास व सहकार्याच्या भावणेमुळेच शक्य झाले असल्याचे देखील या पत्रकात नमूद केले आहे.
मार्च २०२५ अखेर बँकेची एकूण सभासद संख्या १२५८६ एवढी असून बँकेकडे ५७३ कोटीच्या ठेवी जमा झाल्या आहेत. त्याच्या बळावरच बँकेच्या सभासद तथा ग्राहक बांधवाना मार्च २०२५ अखेर रु.३३० कोटी इतके कर्जवाटप केले आहे. या आर्थिक वर्षाचे रु.१९ कोटी एवढे भाग भांडवल असून बँकेचा स्वनिधी रु.५० कोटी एवढा आहे. त्याचबरोबर वर्ष अखेरीस बँकेने एकूण रु. २९० कोटी एवढी गुंतवणूक केली आहे . ३१ मार्च २०२५ अखेर बँकेने एकूण ठेवी रु. ५७३ कोटी इतक्या जमा केलेल्या आहेत . गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २३ कोटी रुपयांची व्यवसायात वाढ झाली आहे. बँकेस ३१मार्च २०२५ अखेर रु. ६ कोटी ६२ लक्ष इतका करपूर्व नफा मिळवला आहे. सर्व क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती पाहता बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी , कर्मचारी वृंद तसेच कर्जदार , ठेवीदार व सभासद यांच्या सांघिक कामगिरीमुळे बँकेस हे प्रगतीचे उद्दीष्ट साध्य करता आले असल्याचे बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी व मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे . मार्च २०२५ अखेरील बँकेची प्रगती ही बँकेच्या पुढील वाटचालीस नवीन उभारी देणारी असून बँकेच्या सभासदांनी व ग्राहकांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवल्याची पावती असल्याचे देखील मोदी यांनी नमूद केले आहे. चालु आर्थिक वर्षात अनंत अडचणी येऊनही बँकेच्या वसुली विभागाने समाधानकारक काम करत बँकेचा निव्वळ एनपीए ०% राखण्यात बँकेने यश मिळवले आहे .
देशातील आर्थिक परिस्थिती वाढती महागाई, बेरोजगारी अशा अवघड परिस्थिती देखील कर्जधारक , ग्राहकांचा विचार करुन बँकेने सुरळीत आर्थिक व्यवहार करत बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक ठेवण्यास यश मिळवले आहे असे मत बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. बँकेचे सर्व सभासद, ग्राहक यांचा विश्वास, बँकेचे संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन व बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वृंदाचे नियोजनबध्द कामकाज यामुळे सन २०२४ – २०२५ मध्ये चांगले कामकाज करणे शक्य झाले आहे. अशीच कामगिरी पुढील आर्थिक वर्षातही कायम ठेवण्याचा बँकेचा प्रयत्न असेल अशी ग्वाही अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .
१९९६ साली केवळ एका शाखेद्वारे अतिशय अल्प अशा भांडवलावर सुरू झालेली अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक आज ५७३ कोटीच्या ठेवीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या बीड, लातूर, धारशिव, छत्रपती संभाजी नगर, पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यात २० शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत आहे. नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेने केज, मुरुड व निलंगा या ठिकाणी बँकेच्या नवीन तीन शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या सर्व नियमांच्या आधीन राहूनच अंबाजोगाई पिपल्स बँकेने आजपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार करत आहे. या कामगिरीच्या बळावरच रिझर्व्ह बँकेने नवीन शाखा सुरू करण्यास परवानगी दिल्याचे मोदी यांनी या पत्रकात नमूद केले आहे. अंबाजोगाई पिपल्स बँक अर्थकारण करत करतच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. ज्यामध्ये शहरातील गुणिजनांचा सन्मान , रक्तदान शिबिर याबरोबरच महिलांसाठी बॅंकिंग प्रशिक्षण शिबिर, विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात बँक अग्रस्थानी असते.या व अशा इतर अनेक कारणांमुळे बँक ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरली असल्याचे समाधान बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले आहे .यापुढेही बँकेचे सन्माननीय संचालक प्रा वसंत चव्हाण, ऍड विष्णुपंत सोळंके, अरुण काळे,पुरुषोत्तम चोकडा, सुरेश मोदी,ऍड सुधाकर कऱ्हाड, संकेत मोदी, शेख दगदुभाई शेख दावल, सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा,हर्षवर्धन वाडमारे, श्रीमती वनमाला रेड्डी, सौ स्नेहा हिवरेकर, प्रा. लक्ष्मण दासूद , सचिन बेंबडे यांच्या सहकार्याने अर्थकारणासोबतच वारंवार असेच सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतील असा संकल्प राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला.
