स्वामी समर्थ अन्नछत्र सभागृहासाठी आ.नमिता मुंदडांच्या विकास निधीतुन 20 लक्ष रूपये, संसार जीवनात अध्यात्मिक अनुष्ठान महत्वाचे-नंदकिशोर मुंदडा
स्वामी समर्थ अन्नछत्र सभागृहासाठी आ.नमिता मुंदडांच्या विकास निधीतुन 20 लक्ष रूपये, संसार जीवनात अध्यात्मिक अनुष्ठान महत्वाचे-नंदकिशोर मुंदडा
—————————— ———————
अंबाजोगाई(प्रतिनिधी)-यशवंतराव चव्हाण चौकालगत असलेल्या शंकर नगर, मोरेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात अन्नछत्र सभागृह बांधकामासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.सौ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या विकासनिधीतुन सुमारे 20 लक्ष रूपये मिळवुन देवु असे सांगताना संसार जीवनात अध्यात्मिक मार्गाने गेले तर खर्या अर्थाने सुख तिथे मिळते.

समाजातील दात्यांच्या योगदानातुन कोणताही यज्ञ पुर्ण करता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केले तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही निष्ठा श्री स्वामी समर्थावर ठेवुन मनोभाव सेवा केली तर तो भाविक भक्तांच्या पाठीमागे खंबीर उभा रहातो या शब्दांत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

शंकर नगर, मोरेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन उत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सकाळी समर्थांची भव्य मिरवणुक, दुपारी महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. दरम्यान याच वेळी मंदिराचे मुख्य सेवेकरी श्री नारायनराव ना डांगे यांच्या पुढाकारातून मंदिराच्या समोर अन्नछत्रासाठी खरेदी केलेल्या जागेवर मान्यवरांच्या उपस्थितीत भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सुरूवातीला व्यासपीठावरील मान्यवरांचा मंदिर कमिटीच्या वतीने सत्कार झाल्यानंतर जेष्ठ सामाजिक नेते बन्सीआण्णा सिरसाट यांनी मनोगत व्यक्त करताना या सामाजिक कार्यासाठी आपण हवे तसे सहकार्य करू जिथे धार्मिक उद्दिष्ट असते तिथे आमची सेवा मनोभावे असते असं ते म्हणाले. शंकरराव उबाळे यांनी देखील मनोगतपर भाव व्यक्त करून सहकार्य बोलुन दाखवले. राम कुलकर्णी यांनी विचार मांडताना संसार जीवनात अध्यात्मिक शक्ती खर्या अर्थाने आनंदी जीवनाचा मार्ग असुन ज्या परमेश्वरासाठी आपण निवारा करू तोच आपल्याला निवारा आयुष्यासाठी देवु शकतो. अन्नछत्र बांधकामासाठी योगदान देण्याची संधी मिळणे खर्या अर्थाने भाग्य असुन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी ही शक्ती दैवी चमत्कार असल्याचे त्यांनी सांगितले.

जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सभागृहासाठी आमदाराच्या वतीने पुढाकार घेताना पहिल्या टप्यात दहा लक्ष रूपये मिळवुन देवु नंतर दुसर्या टप्यात दहा लक्ष रूपये पुन्हा देवुन एक सुसज्ज असं अन्नछत्र सभागृह बांधण्याचा संकल्प त्यांनी बोलुन दाखविला. माणुस सुखासाठी धडपडतो पण खरं सुख अध्यात्म,ज्ञान मार्गातुन मिळते जिथे दु:खाचा विसर झाल्याशिवाय रहात नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिराचे मुख्य सेवेकरी नारायण डांगे यांनी केले. या वेळी व्यासपीठावर बीड जिल्हा मजूर संघाचे चेअरमन बन्सिधर अण्णा सिरसाट, जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब शेप, श्री काजगुंडे साहेब, सरपंच औदुंबर मोरे, अविनाश मोरे, कमलाकर आण्णा कोपले, श्री करनर साहेब, वसंत आबा मोरे, रामकृष्ण पवार, नागनाथ गित्ते, मारोती मोरे, रविकिरण मोरे, रणजित मोरे, महादेव सोमवंशी, कृष्णा भैय्या लोमटे, विशाल सोनवणे, विकास लामताणे, बाला पाथरकर, व्यंकट किर्दंत, मंदार काटे, अनंतराव आरसुडे, राम जाधव, राहुल कदम, जोशी सर, कुलकर्णी काका,
श्री.सत्यप्रेम इंगळे,श्री.डांगे व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, सूत्र संचलन गणेश मामा काळे यांनी केले. या धार्मिक सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त व महिलांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमा पूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज यांची मिरवणूक संपन्न झाली.
