ताज्या घडामोडी

अंबाजोगाई भागात गुंडगिरी करणाऱ्या धोकादायक गुंडाची MPDA कायद्याअंतर्गत हर्सल कारागृहात रवानगी

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा गुंडगिरी करणाऱ्याला दणका 

 अंबाजोगाई भागात गुंडगिरी करणाऱ्या धोकादायक गुंडाची MPDA कायद्याअंतर्गत हर्सल कारागृहात रवानगी

 

बीड (प्रतिनिधी)
    बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शथीचे प्रयत्न चालवले आहेत त्यांना बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. अविनाश पाठक यांची खंबीर साथ लाभली आहे. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे व वाळु माफीयांचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. त्या अनुषधांने पोनि पो.स्टे. अंबाजोगाई शहर यांनी दिनांक 03.02.2025 रोजी इसम नामे आर्यान नरेश मांदळे वय 22 वर्षे रा. बोधीघाट, अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड याचे विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबावतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतोने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.
सदर स्थानबध्द इसमाविरुध्द पो. ठा. अंबाजोगाई येथे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगा करणे, गैरकायदयाची मंडळी जमा करणे, दुखापत करणे, ओळखीचा फायदा घेऊन लुटने, रस्ता आडविणे, नुकसान करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, शिवीगाळ करणे, अवैध शस्र बाळगणे, दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, दगडफेक करणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण ।। गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदरील इसम हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याच्या सवईचा असल्याने अंबाजोगाई पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासून करडी नजर होती. तसेच सदर इसमाने आपले वर्तन सुधारावे म्हणुन यापुर्वी कलम 56(1) मपोका प्रमाणे दि. 31.01.2023 रोजी व CrPC 110 प्रमाणे दि. 15.06.2023 रोजी त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गंभीर गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होता. त्याची अंबाजोगाई शहरात व परीसरात प्रचंड दहशत आहे. त्यांचे विरुध्द सर्व सामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत, तो सर्वसामान्य लोकांना व व्यापाऱ्यांना त्रास देवुन दहशत निर्माण करुन गुन्हे करत होता.
सदर प्रकरणात श्री. अविनाश पाठक जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 12.03.2025 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी हा उदाक्त दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हसुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबत आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पोनि अंबाजोगाई शहर व पो.नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. सदर आदेशावरुन पो.नि. स्थागुशा श्री उस्मान शेख यांनी ताबे पोलीस अंमलदार यांचे मार्फत सदर इसमास दिनांक 30.03.2025 रोजी बीड शहरात ताब्यात घेऊन पो.स्टे. अंबाजोगाई शहर येथे हजर केले आहे. पो.स्टे. अंबाजोगाई शहर येथे सदर इसमास कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे दि. 30.03.2025 रोजी स्थानबध्द करणे करीता रवाना केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपोअ अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, उपविपोअ अंबाजोगाई श्री. अनिल चोरमले यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री उस्मान शेख स्थागुशा बीड, पो. नि. विनोद घोळवे, सपोनि निलंगेकर, पोह/ श्रीकृष्ण वडकर, पोह/पांडुरंग काळे पो.स्टे. अंबाजोगाई शहर यांचे सह पोउपनि श्री. शुशांत सुतळे, सपोउपनि अभिमन्यु औताडे, पोह बाळकृष्ण जायभाये, गणेश हंगे, पोह/युनुस बागवान, विबीषण चव्हाण नेमणुक स्थागुशा बीड यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेढ निर्माण करणारे समाजकंठक यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!