मज्जीद मध्ये झालेल्या स्फ़ोटाने बीड हादरले, रमजान ईद सणाला माथेफिरूने लावले गालबोट
मज्जीद मध्ये झालेल्या स्फ़ोटाने बीड हादरले, रमजान ईद सणाला माथेफिरूने लावले गालबोट
बीड
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण तोंडावर असतानाच आज पहाटे बीड मधील अर्ध मसाला गावात एका मज्जीद मध्ये स्फ़ोट घडवण्यात आल्याने खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरु आहे.
मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध गुन्ह्याच्या घटना समोर येत आसून अलीकडेच बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आल्या नंतर या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांच्यानंतरही बीड शहरासह जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी बातम्या समोर आल्या आहेत. आता पुन्हा एका बीडला हादरवणारी घटना समोर आली आहे.
शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास बीडच्या अर्धामसला गावात मशिदीत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ऐन रमझानमध्ये मशिदीत अशाप्रकारे स्फोट घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांचं पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. हा स्फोट नेमका कुणी घडवला आणि कसा घडला? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. एका माथेफिरूने हा स्फोट घडवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र हा स्फोट घडवण्यामागे आरोपीचा काय हेतू होता. त्याच्याकडे ही स्फोटकं कुठून आली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मशिदीचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे
जिथे स्फोट घडला, त्या भागातील मशिदीतील फरशी फुटली आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा स्फोट घडल्याने मशिदीत लोकांची वर्दळ नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. एका धार्मिक स्थळात हा स्फोट घडल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे. स्फोट घडवणारा माथेफिरू फरार झाला असून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत घटनास्थळी दाखल आहेत. आरोपीचा शोध घेतला जात आहे.