ताज्या घडामोडी

वाहतूक शाखेच्या तीन पोलिसांना मारहाण, पंढरपूर येथील ओयासीस चौकातील घटना, गुन्हा दाखल 

वाहतूक शाखेच्या तीन पोलिसांना मारहाण, पंढरपूर येथील ओयासीस चौकातील घटना, गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर 

    वाळुज वाहतूक सहायक फौजदार, पोलीस अंमलदार व पोलीस हवालदार अशा तिघांना शिवीगाळ करत हाताचापटाने व लाकडी दांड्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा अवस्थेत कार उभी करून प्रवासी भरणाऱ्याने तीन पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा प्रकार पंढरपूर येथील ओयासीस चौकात मंगळवारी (ता. 25) रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडला.

     याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सुधीर बाळकृष्ण गाडगे (वय-35),पोउपनि गायकवाड, पोअं साळवे असे मंगळवारी (ता. 25) रोजी पंढरपूर येथील ओयासीस चौकात सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास वाहतुक नियमन करीत असतांना पांढऱ्या रंगाची इर्टिका कार ( एम एच 43, एक्स एक्स -4093) ही अहिल्यानगरकडे जाणाऱ्या लेफ्ट फ्रिमध्ये शिवम् पान सेंटरच्या समोर रस्त्यात रहदारीला अडथळा निर्माण करून थांबून होती.

त्यामुळे कार चालकास कार तेथून काढण्यास सांगीतले असता तेथे प्रवासी बसवण्यास मदत करणाऱ्या एका इसमाने ‘हा रोड तुमचा नसुन सार्वजनिक आहे’. मी कुठेही गाडी भरीन असे म्हणाला. त्यामुळे सुधीर गाडगे हे त्या गाडीवर कार्यवाही करण्याकरीता ई-चलण मशीनव्दारे फोटो काढत असतांना तो नंबर प्लेट समोर येवुन हुज्जत घालून गाडगे यांच्या शर्टची कॉलर पकडुन ओढले.

यावेळी झालेल्या मारहाणीमुळे पोलीस अंमलदाराच्या शर्टाचे बटन व नेमप्लेट तुटली. त्याच वेळी वाळुज वाहतुक शाखेचे सफौ. शिंदे व पोह. थोरात यांनी समजविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुम्ही माझ्या गाडीवर फाईन कसे मारता असे म्हणुन त्याच्या कार मधील लाकडी दांडा काढून पोह थोरात व स.फौ. शिंदे नाही मारहाण केली.

तसेच अश्लील शिवीगाळ करत तुम बहुत मस्ती आ गये, तुम्हे देख लूंगा. अशी धमकी दिली. वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण होत असल्याचे समजताच वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोउपनि. दिनेश बन, पो.ह. बाबासाहेब काकडे, पो.अं. भगवान मगर, पो.अं. रविंद्र गायकवाड यांनी धाव घेत मारहाण करणाऱ्या एजाज सय्यद मोहम्मद अली, (वय-44), रा. सलामपुरेनगर पंढरपुर याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी सुधीर गाडगे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी एजाज सय्यद मोहम्मद अली व कार चालक रोहीत मधूकर दळवी (वय-21), रा. त्रिमुर्ती चौक वडगांव (को.) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!