कुणाल कामरा यांच्यावर कठोर कारवाई करावी अंबाजोगाई तालुका शिवसेना शिंदे गटाची मागणी
कुणाल कामरा यांच्यावर कठोर कारवाई करावी अंबाजोगाई तालुका शिवसेना शिंदे गटाची मागणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे यांच्या विषयी अपशब्द काढल्या प्रकरणी कुणाल कामरा यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी अंबाजोगाई तालुका शिवसेना शिंदे गटाच्यावतीने करण्यात आली आहे
या संदर्भात अंबाजोगाई तालुका शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा उप प्रमुख राजेभाऊ लोमटे व तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्ट मंडळ पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांना भेटले. या वेळी शिष्ट मंडळाच्या वतीने एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनाद्वारे कुणाल कामरा यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे
या निवेदनावर उपजिल्हा प्रमुख राजाभाऊ लोमटे, तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे यांच्यासह शहर प्रमुख गणेश जाधव, दशरथ चाटे, मनोहर चाटे, लखन जाधव, मनोज जाधव, समीरण मसलकर, अनिल डाके, संतोष दहातोंडे, राजाभाऊ कुडके, हनुमंत हावळे, गणेश चाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Post Views: 320