माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम भाई यांच्या इफ्तार पार्टीला सर्व स्तरातील नागरिकांची उपस्थिती*
माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम भाई यांच्या इफ्तार पार्टीला सर्व स्तरातील नागरिकांची उपस्थिती
*अंबाजोगाई /प्रतिनिधी*
अंबाजोगाई शहराचे माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम भाई यांच्या वतीने रविवार दि 23 मार्च रोजी मौलाली पहाड या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या इफ्तार पार्टीनंतर उपस्थित सर्व रोजेकरी व नागरिकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
मांडवा रोड परिसरात असलेल्या मौलाली पहाड या निसर्गरम्य ठिकाणी दरवर्षी माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम भाई यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवांना निमंत्रित करून रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.यंदा रविवार दि. 23 मार्च रोजी रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली गेली. प्रारंभी रोजा इफ्तार पार पडला. त्यानंतर स्नेहभोजनाचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. यावेळी शेख रहीम भाई म्हणाले की, रोजा इफतारच्या माध्यमातून आपली जी संस्कृती व परंपरा आहे ती गंगा, जमनीची असून ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे आणि गावाचे व तालुक्याचे जे वातावरण आहे ते अबाधित राहिले पाहिजे. यासाठी आपला प्रयत्न असल्याचे रहीम भाई यांनी सांगितले.
रोजा इफ्तार पार्टीला ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा,माजी नगराध्यक्ष महादू मस्के,माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,माजी उपनगरध्यक्ष दिलीप दादा सांगळे, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, चंद्रशेखर वडमारे, प्रा.पंडितराव कराड, सुभाषराव बाहेती, अंबा साखर उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटना समाजसेवी संस्था व त्यांचे प्रतिनिधी आणि अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्व जाती-धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इफ्तार पार्टीनंतर सर्व रोजेकरी यांनी त्याच ठिकाणी नमाज अदा केली .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख रहीम भाई मित्र मंडळ अंबाजोगाई, अलखैर पतसंस्था सर्व संचालक व कर्मचारी आणि विविध संस्थांचे कर्मचारी व सहकारी यांनी परिश्रम घेतले.
