ताज्या घडामोडी

युवकाचा दगडाने ठेचून खून; १२ तासात आराेपीला ठाेकल्या बेड्या

युवकाचा दगडाने ठेचून खून; १२ तासात आराेपीला ठाेकल्या बेड्या

लातूर (प्रतिनिधी )

    २४ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना लातुरातील श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या संकूल परिसरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल केल्या नंतर खुनातील आराेपीला अवघ्या बारा तासात पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत.

    या विषयी पाेलिसांनी दिलेली माहिती आशी की, अक्षय उर्फ आकाश राम तेलंगे (रा. गाेपाळनगर, लातूर) हा नेहमीप्रमाणे श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या काेपऱ्यावरील संकुलात रविवारी रात्री मुक्कामी हाेता. ताे दिवसभर शहरात भटकत हाेता अन् रात्री संकुलाच्या गॅलरीत झाेपत हाेता. दरम्यान, क्वाईल नगर भागातील अक्षय उर्फ भुऱ्या गणपती अंकुशे (२७) याने साेमवारी पहाटे त्याच्या डाेक्यात दगड घातला. त्याची ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केला. सकाळी ८:३० वाजता परिसरातील वाहनतळावर आलेल्या चालक, नागरिकांना घटना समजली. यानंतर त्यांनी शिवाजीनगर ठाण्याला कळविले. घटनास्थळी लातूरचे डीवायएसपी रणजीत सावंत, पाे.नि. दिलीप सागर यांनी भेट दिली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात मयताची बहिण गीता अतुल वरटे (२७, रा. पानचिंचाेली ता. निलंगा) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही अन् खबऱ्याची टीप; एक आराेपी जाळ्यात…
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पाेलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी खबऱ्यांची मदत घेतली. सीसीटीव्ही, खबऱ्याच्या माहितीनंतर आराेपीचा शाेध लागला. क्वाईल नगरमधून आराेपीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. –

 दिलीप सागर, पाेलिस निरीक्षक

अक्षय तेलंगेवर विविध ठाण्यात गुन्हे…
जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात अक्षय उर्फ आकाश तेलंगे याच्याविराेधात विविध गुन्ह्यांची पाेलिस दप्तरी नाेंद आहे. लातुरातील विवेकानंद चाैक, शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चाैक, लातूर ग्रामीण आणि औसा ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.

एक वर्षासाठी केले हाेते तडीपार…
टोळी तयार करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या अक्षय उर्फ आकाश तेलंगे याच्यासह इतरांना एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून तडीपार केले हाेते. याबाबतचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी १७ मार्च २०२५ राेजी जारी केले हाेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!