दंगल सदृश्य परस्थिती हताळन्या साठी अंबाजोगाई शहर, ग्रामीण व बर्दापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यासाठी घेण्यात आली जमाव विसर्जन रंगीत तालीम
दंगल सदृश्य परस्थिती हताळन्या साठी अंबाजोगाई शहर, ग्रामीण व बर्दापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यासाठी घेण्यात आली जमाव विसर्जन रंगीत तालीम
आंबजोगाई (प्रतिनिधी)
दंगल सदृश्य परस्थिती निर्माण झाल्या नंतर पोलिसांना ही वेळीच हताळता यावी या साठी अंबाजोगाई शहर, ग्रामीण व बर्दापूर पोलीस स्टेशन च्या सर्व कर्मचाऱ्या साठी जमाव विसर्जन रंगीत तालीम घेण्यात आली.
येथील यशवंत राव चव्हाण चौका नजिक असलेल्या क्रीडा संकुलाच्या मैदानात बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शना खाली उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या प्रमुख उपस्थिती मधे संपन्न झालेल्या या जमाव विसर्जन रंगीत तालीम प्रसंगी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम पडवळ, बर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाने यांच्या आधीपत्या खाली शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन व बर्दापूर पोलीस स्टेशनचे सर्व महिला पुरुष कर्मचारी उपस्थित होते.
या सर्व कर्मचाऱ्यांना जमाव विसर्जन रंगीत तालीम देण्या साठी बीड पोलिस मुख्यालयातून प्रशिक्षक म्हणून पो हे कॉ संजय रामराव भुतके यांची विशेष उपस्थिती होती.
या वेळी मैदानावर आंदोलन कर्ता जमाव तयार करण्यात आला होता. हा जमाव शासनाच्या व पोलिसांच्या विरोधात घोषणा देत होता, जमावाला शांत करण्या साठी ध्वनी क्षेपका द्वारे सह्यायक पोलीस निरीक्षक निलंगेकर हे सूचना देत होते. याच वेळी पोलीस कर्मचाऱ्यांना जमावाला हताळण्या संदर्भात सूचना देण्यात येत होत्या. संतप्त जमाव दगदफेक करत होता. याच वेळी जमाव पांगवण्या साठी सर्व प्रथम लाठीचार्ज, त्या नंतर
ढाल सेक्शनचा प्रयोग, त्या नंतर गॅस सेक्शनचा प्रयोग, रायफल सेक्शनचा प्रयोग करण्यात आला.
या वेळी जमावाला भडकवणाऱ्या मुख्यसूत्रधारास शोधून त्याला ताब्यात कसे घ्यायचे या संदर्भात सूचना देण्यात आल्या. तसेच गोळीबार करून जमाव पांगवताना
जखमी होऊन पडलेल्या इसमास ताब्यात घेईन त्याला उपचारार्थ रुग्णालयात कसे पाठवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
एकूणच या रंगीत तालीमच्या वेळी पोलीस कर्मचारी व आंदोलनकर्ते यांच्यात उत्साह पहावयास मिळाला.
